घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकोरोेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

कोरोेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

Subscribe

नाशिक : राज्यभर कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून कुठल्याही विपरित परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग तयार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली.

कोरोनाचे रुग्ण राज्यभर वाढत असतांना जिल्ह्यात आज एकही रुग्ण आढळून आला नाही मात्र शहरात तीन पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. जिल्हा आरोग्य विभागाने यापुर्वीच जिल्ह्यात कोरोना लसीकरणावर भर दिल्याने संपूर्ण जिल्ह्यात 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. यामुळे जिल्हावासियांची प्रतिकारशक्ती कायम असल्याने रुग्णसंख्येत वाढ आढळून आलेली नाही.

- Advertisement -

जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी बघता पहिला डोस 90 टक्के नागरिकांनी तर दुसरा डोस 81 टक्के नागरिकांनी घेतला आहे तर बुस्टर डोस 5 लाख 50 हजार नागरिकांनी घेतला आहे. सध्या जिल्ह्यात लसींचा तुटवडा जाणवत असून लसींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पुढील लसींचा डोस लवकरच जिल्हा आरेाग्य विभागाला प्राप्त होणार आहे.

कोरोना काळात अचानक ऑक्सिजन संपल्यामुळे आरोग्य विभागाची तारांबळ उडाली होती. अचानक परिस्थिती उद्भवल्यास ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये यासाठी यंदा आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे. यामुळे कुणालाही कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य केंद्राशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -
जिल्हा आरोग्य विभाग सज्ज

कोरोनामुळ विपरीत परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेशी तयारी करुन ठेवली आहे. यामध्ये सर्व आरोग्य केंद्रांवर ऑक्सिजन भरपूर प्रमाणात आहे, बेड, व्हेंटीलेटर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सिव्हील हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी ऑक्सिजन प्लांट, जम्बो सिलेंडर, औषधांचे प्रमाण, टेस्टिंग किट या सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना कोरोनाची मंद लक्षणे (माईल्ड सिम्पटम्स) जाणवत आहेत त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

पंचसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन
  • मास्क वापरणे
  • घरीच थांबणे
  • सर्दी, खोकला ताप यांनी कुणाच्याही संपर्कात येऊ नये
  •  वारंवार हात धुणे
  • लसीकरण करुन घेणे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -