घरक्रीडाब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले रुग्णालयात दाखल

ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले रुग्णालयात दाखल

Subscribe

ब्राझीलचा माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पेले हे कर्करोगाशी झुंज देत असून, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्राझीलचा माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पेले हे कर्करोगाशी झुंज देत असून, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले यांना रुग्णालयात दाखल केले असले तरी, सध्या गंभीर असे काही नाही, अशी माहिती त्याची मुलगी नॅसिमेंटोने दिली. (Former great Brazilian footballer Pele admitted to hospital)

नॅसिमेंटोने इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच, ब्राझीलमध्ये एका वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार, पेले यांना सूज आल्याने अल्बर्ट आइनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे. यानंतर पेलेची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत सत्य सांगितले. तिने लिहिले, आज माझ्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल मीडियामध्ये खूप बातम्या येत आहेत. ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नाही. सात महिन्यांपूर्वीही पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नियमित तपासणी करून ते बाहेर आले.

- Advertisement -

सप्टेंबर 2021 मध्ये 82 वर्षीय पेले यांच्या कोलन ट्यूमर काढण्यात आला होता. तेव्हापासून नियमित रुग्णालयात जातो आहे. ईएसपीएन ब्राझीलने नोंदवले की पेले यांना हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यांच्या केमोथेरपी उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल त्यांच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी चिंता व्यक्त केली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

पेलेने ब्राझील तीन वेळा विश्वविजेता बनवले आहे. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक जिंकला होता. 1958 च्या विश्वचषक फायनलमध्ये सुदान विरुद्ध दोन गोल केले. पेलेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले. त्याने ब्राझीलसाठी 91 सामन्यात 77 गोल केले.

- Advertisement -

हेही वाचा – आयसीसी रँकिंगमध्ये संजू, श्रेयश आणि शुभमनची भरारी, कोणत्या नंबरवर कोण?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -