घरताज्या घडामोडीAmitabh Dayal Death : वयाच्या 61 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता अमिताभ...

Amitabh Dayal Death : वयाच्या 61 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता अमिताभ दयाल यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ दयाल यांचे आज बुधवारी 2 फेब्रुवारीला पहाटे 4:30 वाजता हृदयविकाच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून, सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. 17 जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयाल दाखल करण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ दयाल यांचे आज बुधवारी 2 फेब्रुवारीला पहाटे 4:30 वाजता हृदयविकाच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून, सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. 17 जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयाल दाखल करण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मात्र, उपचारानंतर शनिवारी ते कोरोनामुक्त असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहीती अमिताभ दयाल यांची पत्नी मृणालिनी पाटील यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Dayal (@amitabhdayal)

- Advertisement -

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी संजय दत्त आणि जॉन अब्राहम यांच्यासमवेत 2005 मध्ये ‘विरुद्ध’ या चित्रपटात काम केले. तसेच, 2003 मध्ये नंदिता दास आणि ओम पुरी यांच्यासोबत ‘कगार’ चित्रपटात काम केले. याशिवाय त्यांनी त्याची पत्नी मृणालिनी पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या धूम, रंगदारी, ये दिल्लगी या चित्रपटांमध्येही काम केले.

अभिनेते अमिताभ दयाल यांचा जन्म छत्तीसगडमधील बिसालपूर येथे झाला. त्यामुळे त्यांचे बरेचसे नातेवाईक त्याठिकाणी राहत असल्यामुळे त्यांची वाट पाहत आहेत. त्यानंतरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 2009 मध्ये अभिनेते अमिताभ दयाल यांनी लग्नबंधनात अडकले होते. त्यांना शिवम पाटील आणि अमृता पाटील अशी दोन मुले त्यांना आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – Soyrik Movie: लागिरं झालं जी फेम आज्याची सोयरीक ‘या’ दिवशी येणार थिएटरमध्ये


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -