घरताज्या घडामोडीCorona Vaccine: बनारसमध्ये मिळाल्या नकली कोरोना लस आणि चाचणी किट; अनेक राज्यांमध्ये...

Corona Vaccine: बनारसमध्ये मिळाल्या नकली कोरोना लस आणि चाचणी किट; अनेक राज्यांमध्ये होणार होता पुरवठा

Subscribe

वाराणसीमधील स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) मोठ्या प्रमाणात नकली लस आणि नकली कोरोना चाचणी किट जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एसटीएफने पाच लोकांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नकली लस आणि नकली कोरोना चाचणी किटचा पुरवठा अनेक प्रदेशांमध्ये करत होते. दरम्यान जप्त केलेल्या नकली लस आणि कोरोना चाचणी किटची किमत जवळपास ४ कोटी रुपये आहे.

- Advertisement -

एसटीएफच्या माहितीनुसार, २ फेब्रुवारीला नकली कोविशिल्ड आणि Zycov Dलसीसोबत नकली कोरोना चाचणी किट मोठ्या प्रमाणात बनवल्या गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी राकेश थवानी, संदीप शर्मा, लक्ष्य जावा, शमशेर आणि अरुणेश विश्वकर्मा यांना अटक केली आहे. आरोपींकडून नकली कोरोना चाचणी, नकली लस, नकली झायकोव्ही डी लस, पॅकिंग मशीन, स्वाब स्टिक जप्त केले आहेत. चौकशीत राकेश थवानी म्हणाले की, तो संदीप शर्मा, अरुणेश विश्वकर्मा आणि शमशेरसोबत मिळून नकली लस आणि चाचणी किट बनवत होता आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचा पुरवठा करत होता.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींची चौकशी करून प्रकरणाबाबत सर्व माहिती गोळा केली. पुढील कारवाई केली जात आहे. जप्त केलेल्या कोरोना लस आणि चाचणी किटचे शुल्क बाजाराभावानुसार जवळपास ४ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Pfizer, BioNTech ने 5 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी मागितली परवानगी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -