घरताज्या घडामोडीप्रकल्प लटकवा, अटकवा, भटकवा हीच सरकारची कामाची पद्धत

प्रकल्प लटकवा, अटकवा, भटकवा हीच सरकारची कामाची पद्धत

Subscribe

प्रकल्प लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची नवी पद्धत असल्याचा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीच आम्ही त्यांच्या हेतूंवर शंका उपस्थित केली होती.

अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्रामुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याचे आम्ही म्हटले होते. मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न आम्ही त्यावेळी विचारला होता. केंद्राने पाठवलेल्या पत्रामुळे आमची शंका रास्त होती हे स्पष्ट झाले आहे, असे शेलार म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव त्यांच्याच एक्सपर्ट कमिटीनें फेटाळला होता. ठाकरे सरकारच्या अहंकाराचा सामना मुंबईतील जनतेला करावा लागत असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. प्रकल्प लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची पद्धत आहे. आधी मेट्रो कारशेड प्रकल्प लटकवण्याचा प्रयत्न झाला. दिरंगाई करण्याचे प्रयत्न केले.

आता आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता न करता प्रकल्प अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासोबतच चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करून त्यांना भटकवण्याचा प्रयत्नदेखील सुरू असल्याचा आरोप शेलार यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -