घरताज्या घडामोडीकौसा कोविड केअर सेंटर ठरले रुग्णांसाठी लाभदायक

कौसा कोविड केअर सेंटर ठरले रुग्णांसाठी लाभदायक

Subscribe

1700 रुग्णांवर यशस्वी उपचार

कोरोनाने सर्वत्र हाहा:कार माजवलेला असताना मुंब्रा कौसा येथील कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमुळे मुंब्रा, कौसा सहित आसपासच्या परिसरातील कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना सुखरुप घरी परत जाणे शक्य झाले. या कोविड केअर सेंटरमध्ये आतापर्यंत 1700 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यापैकी अवघ्या बारा जणांचा मृत्यू झाला तर इतरांना वाचवण्यात यश आले.

मुंब्रा कौसा परिसरात कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने व परिसरातील वैद्यकीय सुविधा अपुरी पडू लागल्याने कौसा येथील मौलाना आझाद क्रीडा संकुलात सुरुवातीला कोविड केअर सेंटर व कालांतराने संपूर्ण कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले. कोविडशी लढण्यासाठी या ठिकाणी 100 खाटांचे अतिदक्षता कक्ष उभारण्यात आले. या 100 आयसीयु खाटांसाठी 100 व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करुन देण्यात आले. एकाही रुग्णाला औषधे आणण्यासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारे सर्व आवश्यक औषधे व गरजेच्या वस्तू उपलब्ध करुन देण्यात आल्या.

- Advertisement -

ठाणे महापालिकेतर्फे डॉ. शर्मिन डिंगा या येथे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सोबत डॉ. रिझवान मुबारक, डॉ. मसूद शेख, डॉ. माझ अन्सारी हे डॉक्टर सुरुवातीपासून रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. मुमताज शाह हे देखील समन्वयक म्हणून येथे आपली सेवा देत आहेत. रुग्णांना नैसर्गिक वातावरणात उल्हासदायक मन:स्थिती लाभावी म्हणून मोकळ्या मैदानात काही व्यायाम प्रकार करुन घेतले जातात.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी ठकुबाई भालेकर या 95 वर्षीय वृध्द महिलेवर यशस्वी उपचार करण्यात यश आले. सर्व अत्याधुनिक उपकरणे, आवश्यक औषधे, संतुलित आहार व काळजी घेणारी डॉक्टर मंडळी यांच्या सहकार्याने रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत.

- Advertisement -

या केंद्राच्या समन्वयक डॉ. शर्मिन डिंगा म्हणाल्या, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सहकार्यामुळे सर्व आवश्यक सुविधा या केंद्रामध्ये व रुग्णालयामध्ये पुरवणे शक्य झाले आहे. ज्या रुग्णांना कोविड झालेला नाही मात्र त्याची लक्षणे आहेत अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी या ठिकाणी 10 खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मुंब्रा कौसा परिसरात संशयास्पद नागरिकांच्या तपासणीसाठी अँटिजन टेस्ट केली जात आहे. दररोज 200 जणांची ही तपासणी केली जाते. त्यासाठी मुंब्रा व कौसा परिसरातील विविध ठिकाणी दररोज तपासणी पथक जाते व नागरिकांची तपासणी केली जाते. दोन डॉक्टर व इतर 17 जणांचे वैद्यकीय पथक याकामी कार्यरत आहे. कौसा येथील या सुविधेचा लाभ केवळ मुंब्रा कौसा नव्हे तर ठाणे, भिवंडी, मीरारोड सहित आजूबाजूच्या परिसरातील अनेक रुग्णांना झाल्याची माहिती मुमताज शाह यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -