घरताज्या घडामोडीसार्वजनिक बांधकाम खात्याच्या डोळेझाकीने पनवेल, उरण आणि वाशी रस्त्यावर धूळच धूळ

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या डोळेझाकीने पनवेल, उरण आणि वाशी रस्त्यावर धूळच धूळ

Subscribe

व्हॅक्यूम स्वीपर कधी मिळणार?  लोकप्रतिनिधींचीही टाळाटाळ

उरण ते नवी मुंबई आणि उरण ते पनवेल या रस्त्यांवरचा प्रवास प्रवाशांना नकोसा झाला आहे. पावसाळा संपला असल्याने रस्त्यावर आलेली चिखल माती आता वाळली असल्याने रस्त्यावर धुळीचे लोंढे उसळत आहेत! या धुळीमुळे सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणारे प्रवाशी , खाजगी रिक्षातून दुचाकीवरून आणि खाजगी बिना एसी गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांना नाकी नऊ आले आहे. या सर्व रस्त्यांवरची धूळ व्हॅक्युम स्विपर मशीनने काढून टाकण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍या सामान्य प्रवाशांचा मात्र नेहमीच्या धुळीने ‘भूत’ होत आहे. चांगल्या कपड्यांचा अवघ्या एका फेरीच्या प्रवासातच नूरच पालटत असल्याने या मार्गावर प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना हा प्रवास सध्या नकोसा झाला आहे. मात्र बोलायचे कुणाला आणि ऐकणार कोण अशा स्थितीत असलेल्या प्रवाशांना ना आमदार भेटत ना त्यांचे प्रतिनिधी. यामुळे रस्त्यावरची वाहतूक अक्षरश: बेवारसपणे सुरू असल्याचे चित्र आहे.

हजारो उरणकरांना नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरिता पनवेल, वाशी, बेलापूर, खारघर असा प्रवास करावा लागतो. या प्रवासात नवी मुंबईत जाताना जासई ते अगदी बेलापूरपर्यंत आणि पनवेलकडे जाताना जासई ते चिंचपाडा या मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. खिडक्या बंद कराव्यात तर प्रचंड उष्मा आणि उघड्या ठेवाव्यात तर प्रचंड धुळीचा मारा असा दुहेरी त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून नवी मुंबई पालिकेने या मार्गावर बॅटरी बसेस सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

- Advertisement -

एसटीची संतापजनक डोळेझाक

एस टी महामंडळाने तर उरण डेपोला वार्‍यावरच सोडलेले दिसते. जुन्या असलेल्या वाहक चालकांच्या दबावामुळे एसटीच्या सेवेचे हाल झाले आहेत. बसेसच्या स्वच्छेतेने तर केव्हाच विक्रम केला आहे. बसमधील बैठकांच्या अवस्थेने प्रवाशांचे कपडे माखण्याचे प्रमाणही वाढले आहे. वेळेत बसेस सोडण्याकडे तर पध्दतशीर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवाशी करतात.


हे ही वाचा – ‘गर्व से कहो हम हिंदू है’, मनसेनं हिंदूत्वावरुन शिवसेनेला डिवचलं

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -