घरताज्या घडामोडीपुण्यात आगीचे लोट : फर्निचर गोदामाला भीषण आग

पुण्यात आगीचे लोट : फर्निचर गोदामाला भीषण आग

Subscribe

अग्निशामन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

पुण्यात पहाटे अगीने रौद्र रूप धारण केलं. पहाटेच पुणेकरांना आगीचा सामना करावा लागला. पुण्यात पहाटे ४ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. पुण्याच्या उंड्री येथे एका गोदाला ही आग लागली. यात गोदामातील फर्निचर आगीत खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

- Advertisement -

फर्निचर गोदामाला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट समजलेले नाही. अग्निशामन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तरी सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीमुळे गोदामातले सर्व सामान जळून खाक झाले. आगीची भीषणता तीव्र होती. त्यामुळे गोदामाच्या आसपासच्या परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.

- Advertisement -


हेही वाचा – वरळीत अपघात ;महिलेसह तीन ठार


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -