घरट्रेंडिंगVideo : करोनामुळे मृत्यू मृतदेह दोन दिवस घरीच पडून

Video : करोनामुळे मृत्यू मृतदेह दोन दिवस घरीच पडून

Subscribe

करोनामुळे सर्वात जास्त मृत्यू हा इटली मध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आत्तापर्यंत २५० जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात करोनाच्या फैलावानंतर अनेकांना आपला जीव जमवावा लागला आहे. चीन पाठोपाठ इतर देशांनाही करोना व्हायरसची लागण झाली.करोनामुळे सर्वात जास्त मृत्यू हा इटली मध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आत्तापर्यंत २५० जणांचा मृत्यू झाला आहे. इटली मध्ये राहणाऱ्या एका इटालीयन अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. करोनामुळे माझ्या बहिणीचा मृत्यू झाला.तिचा मृतदेह दोन दिवसांपासून घरी आहे.तिच्या अंत्यसंस्कारासाठी त्याला मदत हवी आहे असं त्याने व्हिडीओ मधून म्हटलं आहे.सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aiuto le istituzioni mi hanno abbandonato

Luca Franzese ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮಾರ್ಚ್ 11, 2020

- Advertisement -

लूका फ्रेंजी असं या इटालीय अभिनेत्याचं नाव आहे. करोना व्हायरसमुळे त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने तिचा मृतदेह दोन दिवसांपासून घरात ठेवला आहे. आता मी काय करू तेच कळत नाहीय.मला सर्वापासून वेगळ ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे माझ्या बहिणीचे अंत्यसंस्कराही करू शकत नाही. मी बऱ्याच जणांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही माझ्या मदतीला आले नाही.असं लूका याने व्हिडीओ मध्ये म्हटलं आहे.तसेच व्हिडीओमध्ये लूकाच्या मागे बेडवर दिसत असलेली महिला हि त्याची मृत अवस्थेतीतल बहिण असल्याच देखिल त्याने सांगितलं आहे. सोशल मीडियावरचा व्हिडीओ पाहून इटालियन अधिकाऱ्यांनी त्याच्या बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी मदत केली मात्र त्याच्या कुटुंबातील कोणालाही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही.

करोना व्हायरसच्या फैलावामुळे लूकाला त्याच्या कुटूंबापासून दूर ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपासून बहिणीच्या मृतदेहासोबत असल्याने लूकालाही करोनाची लागण झाल्याची शंका व्यक्त केली आहे. लूकाहा इटलीमधील टेलिव्हिजन कलाकार आहे. त्याने इटलीच्या गुमराह या टेलिव्हिजन शो मध्ये काम केलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – करोनामुळे भारताला लागून असलेल्या पाच देशांच्या सीमा केल्या सील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -