घरताज्या घडामोडीआज दहावीचा निकाल : कसा आणि कुठे पहाल?

आज दहावीचा निकाल : कसा आणि कुठे पहाल?

Subscribe

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर २९ जुलैला दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळातर्फे मार्चमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यातच उत्तर पत्रिका शिक्षकांकडे पोहोचण्यास व तपासून पुन्हा मंडळाकडे विलंब झाल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडला होता. परंतु राज्य मंडळाने निकालासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण केली असून, २९ जुलैला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल पाहता येणार आहे. ऑनलाईन निकालानंतर दुसर्‍या दिवसापासून दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने http://verification.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी ३० जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत व छायाप्रतीसाठी ३० जुलैपासून १८ ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे.

- Advertisement -

ssc result notification

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात शुल्क भरून अर्ज करणे आवश्यक राहिल. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील.

- Advertisement -

ssc result notification

निकाल कसा पाहायचा?

– निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या वेबसाईटला विझिट करा.

– तिथे “Maharashtra SSC Result 2020” या हायपरलिंकवर क्लिक करा.

– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

– त्यानंतर निकाल आपल्या स्क्रिनवर दिसेल.

– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -