घरक्राइमबापरे! न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकवणे आरोपीला पडले महागात

बापरे! न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकवणे आरोपीला पडले महागात

Subscribe

राग आला म्हणून आरोपींनी न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची घटना भिवंडी न्यायालयात घडली आहे.

राग आल्यामुळे एका आरोपींने चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी न्यायालयात गेल्या वर्षी जानेवारीमध्ये घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या एका आरोपीला शुक्रवारी ठाणे न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावसी आहे. अश्रफ वैदुजमा अंसारी असे आरोपीचे नाव आहे.

नेमके काय घडले?

भिवंडी न्यायालयात २९ जानेवारी २०१९ रोजी अश्रफला सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायाधीश एच. जे. पठाण यांच्या न्यायालयात हजर केले असता अश्रफने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी ‘तू आणखी सहा महिने कारागृहात राहण्यास आणि दंड भरण्यास तयार आहेस का?’ अशी विचारणा केली. हे विचारल्यानंतर अश्रफला राग आला आणि त्यांनी रागात न्यायाधीशांच्या दिशेने पायातील चप्पल भिरकावली. परंतु, न्यायाधीशांनी प्रसंगवधान राखून बाजूला झाले. त्यानंतर अश्रफने पुन्हा पायातील दुसरी चप्पल हातात घेऊन चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. मात्र, ही चप्पल एका महिला वकिलाला लागली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अश्रफविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याचा निकाल आज, शुक्रवारी ठाणे न्यायालयात लागला असून साक्षी पुरावे ग्राह्य धरत न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी आरोपीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नवजात अर्भक कचराकुंडीत फेकून मावशीने काढला पळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -