घरताज्या घडामोडीसंसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

Subscribe

संसदेचे हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या साथीमुळे रद्द करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. त्या पत्राला उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे.

राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना अनौपचारिकरित्या ही माहिती दिली आहे. नेहमी नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन डिसेंबरमध्ये अखेर होणार्‍या हे अधिवेशन टाळावे, अशाच मताचे ते होते, असे जोशी यांनी पत्रात नमूद केले आहे. साथीच्या काळात हिवाळा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सध्या आपण डिसेंबरच्या मध्यात आहोत आणि कोरोनावरील लस लवकरच अपेक्षित आहे, असे जोशी यांनी सांगितले.

- Advertisement -

सरकारची पुढील अधिवेशन लवकरात लवकर घेण्याची इच्छा आहे. कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व स्थितीचा विचार करता जानेवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणे योग्य ठरेल, असे जोशी यांनी कळवले आहे.
सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असताना पावसाळी अधिवेशन निमंत्रित केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमांवर नवे कृषी कायदे रद्द करावेत म्हणून आंदोलन करत आहेत. त्यामुळेच हे अधिवेशन रद्द केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -