घरअर्थजगतजानेवारी - मार्च कालावधीत घरांची सर्वाधिक विक्री, २०१५ पासूनची विक्रमी वाढ

जानेवारी – मार्च कालावधीत घरांची सर्वाधिक विक्री, २०१५ पासूनची विक्रमी वाढ

Subscribe

भारतात कोरोना महामारीच्या संकटाच्या काळानंतर पहिल्यांदाच जानेवारी ते मार्च या कालावधीत सर्वाधिक अशी घरांची विक्री झाली आहे. जवळपास टॉप सात शहरांमध्ये ९९ हजार ५५० घरांची विक्री झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही घरांची विक्री ही २०१५ पासून सर्वाधिक अशी आहे. घरांच्या विक्रीतील वाढ यंदाच्या तिमाही सत्रात मोठी अशी पहायला मिळाली आहे. जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत ५८ हजार २९० इतक्या घरांची विक्री झाली होती. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत ७१ टक्के असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबरच्या तिमाही सत्रात एकुण ९० हजार ८६० घरांची विक्री करण्यात आली आहे.

मुंबई मेट्रोपॉलिटन शहरात तसेच दिल्लीत ४८ टक्के इतक्या प्रमाणात घरांची विक्री झाली आहे. त्यामध्ये दिल्लीत ११४ टक्के इतक्या प्रमाणत घरांच्या विक्रीतील वाढ झाल्याचे समोर आले आहे. घरांच्या नव्या प्रकल्पामध्ये टॉप सात शहरांमध्ये ४३ टक्के इतकी वाढ दिसून आली आहे. या कालावधीत ८९ हजार १५० घरांची विक्री करण्यात आली आहे. जानेवारी २०२२ साठीची ही घरांची विक्री आहे. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ७३ हजार ७७० घरांची विक्री करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण आणि हैद्राबाद येथे सर्वाधिक अशा घरांच्या विक्रीचा आकडा समोर आला आहे. त्यामध्ये ५१ टक्के इतक्या नव्या घरांच्या विक्रीचा आकडा समोर आला आहे. मुंबईत ५९ टक्के घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. तर हैद्राबाद येथे ७१ टक्के इतक्या घरांच्या विक्रीतील वाढ झाली आहे. मार्चनंतर घरांचे अनेक प्रकल्प हे विक्रीसाठी उपलब्ध झाले, तरीही विक्री न झालेल्या घरांच्या आकडेवारीत यंदा २ टक्के घसरण झाली आहे. मार्च अखेरीस विक्री न झालेल्या घरांची संख्या ही ६.२८ लाख इतकी आहे.

गृहनिर्माण क्षेत्रातील घौडदौड ही मार्च अखेरीस यंदा पहायला मिळाली. सरासरी १० टक्के प्रत्येक तिमाहीला घरांच्या विक्रीतील वाढ दिसली. तर संपूर्ण वर्षभरात ७१ टक्के ही वाढ दिसल्याची माहिती अनॅरॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली आहे. याआधीच्या कोरोनाच्या दोन लाटांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेचा तितकासा परिणाम हा घरांच्या विक्रीवर दिसून आलेला नाही. घरांच्या खरेदीसाठीची वाढती मागणी पाहता, कोरोनाच्या महामारीच्या संकटानंतरची गरज पाहता घरांच्या विक्रीतील वाढ ही अपेक्षित आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -