घरक्राइमBareilly News: बलात्काराच्या खोट्या आरोपात 'तो' 4 वर्षे तुरुंगात राहिला, अखेर कोर्टाने...

Bareilly News: बलात्काराच्या खोट्या आरोपात ‘तो’ 4 वर्षे तुरुंगात राहिला, अखेर कोर्टाने मुलीला धडा शिकवला

Subscribe

तरुणाने जेवढे दिवस खोट्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात घालवले, तेवढेच दिवस तुरुंगात राहण्याची शिक्षा आता मुलीला सुनावण्यात आली आहे.

बरेली:बलात्काराच्या गुन्ह्यात साक्ष देण्यास नकार देणाऱ्या मुलीला 1 हजार 653 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. तरुणाने जेवढे दिवस खोट्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात घालवले, तेवढेच दिवस तुरुंगात राहण्याची शिक्षा आता मुलीला सुनावण्यात आली आहे. या निर्णयामुळे बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या महिलांमध्ये न्यायालयाचा धाक निर्माण होईल, असे मानले जात आहे. (Bareilly News Uttar Pradesh Delhi court decision is a lesson for women who file false rape cases)

शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ज्ञानेंद्र त्रिपाठी यांच्या न्यायालयाने मुलीला 1,653 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. मुलीने पोलिसांना आणि नंतर कोर्टात दिलेल्या 164 च्या जबानीत अजयने तिला अंमली पदार्थ पाजून दिल्लीला नेल्याचे सांगितले होते. तेथे तिला खोलीत बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केला, असं सांगितलं होतं. परंतु चार वर्षांनंतर, जेव्हा मुलीने तिच्या साक्षीदरम्यान हे विधान मागे घेतले, तेव्हा अजयची 1,653 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली. त्यामुळे मुलीला धडा शिकवण्यासाठी न्यायालयाने तेवढेच दिवस तिलाही तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

जर अजय तुरुंगात नसता तर त्याला 1,653 दिवसांत किमान वेतन म्हणून 5,88,822 रुपये मिळाले असते, असेही न्यायालयाने मान्य केले. हाच दंड मुलीला ठोठावण्यात आला. अधिवक्ता अजय लक्ष्मी म्हणाले की, सहसा अशा प्रकारची परिस्थिती अनेक बलात्काराच्या घटनांमध्ये उद्भवते. यामुळे न्यायालयाचा वेळ तर वाया जातोच, शिवाय आरोपी तरुणांची सामाजिक प्रतिष्ठाही बिघडते. त्याला तुरुंगात राहावे लागते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबही त्रस्त होते.

आयपीसी कलम 195 अंतर्गत तक्रार

आरोप मागे घेतल्यानंतर मुलीविरोधात भारतीय दंड संहिता 195 नुसार न्यायालयात तक्रार दाखल केली. सहाय्यक सरकारी अधिवक्ता सुनील कुमार पांडे यांनी सांगितले की, ज्या प्रकरणात जन्मठेप किंवा सात वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा आहे, त्या प्रकरणात खोटे पुरावे देणे आणि बनवण्याबाबत तक्रार दाखल करण्याची तरतूद आहे.

- Advertisement -

बलात्काराच्या जवळपास पाच हजार केसेस कोर्टात

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका अंदाजानुसार, बलात्काराचे सुमारे पाच हजार खटले न्यायालयात सुरू आहेत. यामध्ये POCSO कायद्याखालील प्रकरणांचाही समावेश आहे. बलात्काराच्या आरोपात जामीन मिळणे खूप अवघड आहे. अशा स्थितीत आरोपी बराच काळ तुरुंगात राहतो. पोलीस, डॉक्टर आणि दोन्ही बाजूचे साक्षीदार यांना न्यायालयात बोलावून त्यांचे जबाब नोंदवले जातात. खटल्यात साक्ष देताना पीडितेने तिचे आरोप नाकारले तर प्रत्येकाची मेहनत व्यर्थ जाते. अशा प्रकरणांमध्ये आता न्यायालयाने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा: Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांना मोठे यश; पाचव्या आरोपीला ताब्यात)


Edited By- Prajakta Parab

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -