घरक्राइमCrime News: धक्कादायक! NEETला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; चार विद्यार्थ्यांना अटक

Crime News: धक्कादायक! NEETला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; चार विद्यार्थ्यांना अटक

Subscribe

राजस्थानमधील कोटा येथे कोचिंगमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून NEET ची तयारी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

कोटा: राजस्थानमधील कोटा येथे कोचिंगमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून NEET ची तयारी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे. (Crime News Shocking Gang rape of minor girl appearing for NEET exam Four students arrested)

आरोपी बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थिनीचा आरोप आहे की, त्यापैकी एकाने तिची फसवणूक करून आपल्या फ्लॅटवर बोलावले होते. यानंतर सर्वांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींचे वय 18, 19, 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींपैकी एक मुख्य आरोपी असून, तो विद्यार्थ्यीनीचा मित्र होता आणि त्यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. तो यूपीचा रहिवासी आहे.

- Advertisement -

अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

या प्रकरणावर एएसपी उमा शर्मा यांनी सांगितले की, कोटामध्ये राहून एक अल्पवयीन कोचिंग विद्यार्थी वैद्यकीय पदवीची तयारी करत होता. त्याची सोशल मीडियावर यूपीतील एका मुलाशी मैत्री झाली. जी राजस्थानमध्ये राहून NEET ची तयारी करत होती. विद्यार्थिनीला आपल्या फ्लॅटवर बोलावून त्याने मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना केली अटक

13 फेब्रुवारी रोजी पीडितेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

या कलमांतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम 376 ड (सामूहिक बलत्कार), 376 (बलात्कार) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिचे समूपदेशन करण्यात येत आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

(हेही वाचा: Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणात गैरप्रकार, समाजाची फसवणूक; प्रकाश शेंडगेंचा आरोप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -