घरक्राइमNashik Crime : चोरांचा आयसीआयसीआयच्या लॉकर्सवर दरोडा; 222 खातेदारांचे कोटींचे सोने पळविले

Nashik Crime : चोरांचा आयसीआयसीआयच्या लॉकर्सवर दरोडा; 222 खातेदारांचे कोटींचे सोने पळविले

Subscribe

आयसीआयसीआय होम फायनान्सच्या 222 खातदेरांचे लॉकर्स फोडून चोरांनी तब्बल 4 कोटी 92 लाख रुपयांचे सोने पळविले.

नाशिक : नाशिकच्या जुना गंगापूर नाका येथील इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (ICICI) होम फायनान्स या संस्थेच्या कार्यालयावर चोरांनी दरोडा टाकल्याची माहिती समोर येत आहेत. चोरांनी 222 खातदेरांची लॉकर्स फोडून तब्बल 4 कोटी 92 लाख रुपयांचे सोने पळविल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. (Nashik Crime icici home finance lockers Thieves rob 222 account holders gold stolen 4 crore 92 lakh)

नाशिक शहरातील जुना गंगापूर नाका डोंगरे वसतीगृह चौकात आयसीआयसीआय होम फायनान्स या संस्थेचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे. हा परिसर कायम गजबजलेला असतो. मात्र, तरीही चोरांनी याठिकाणी दरोडा टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोणालाही थांगपत्ता लागू न देता चोर तिथपर्यंत पोहोचले कसे, असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत. दरम्यान, याप्रकरणी बँकेचे ॲडमीन मॅनेजर जयेश के. गुजराथी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Crime News : घातक शस्त्रांसह दोन तरुणांना अटक, शिवडी पोलिसांसह गुन्हे शाखेची कारवाई

गुजराथी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, चोरट्यांनी शनिवारी (4 मे) मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान दरोडा टाकला. चोरटे फायनान्स कंपनीच्या प्रादेशिक व्यवस्थापकांच्या दालनाच्या खिडकीतून आत शिरले आणि त्यांनी मुख्य कार्यालयात ठेवलेल्या सेफ्टी लॉकरच्या चाव्या शोधून लॉकर उघडले. लॉकरमधील 222 ग्राहकांचे 13 किलो 385.53 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.

- Advertisement -

लॉकर उडल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस (Locker Explodes Theft Reveal)

दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोल्ड लोन सर्व्हिस असोसिएट किरण जाधव हे एका ग्राहकाचे दागिने सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी लॉकर उघडले असता त्यांना लॉकर रिकामे दिसले. लॉकरमध्ये दागिने दिसून न आल्याने त्यांनी यासंदर्भात बँकेतील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चौकशी केली. मात्र कोणीही माहित नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे बँकेतील तीन सीसीटीव्हीची तपासणी केली. यावेळी मध्यरात्री दोन चोरांच्या हालचाली लॉकर रुममध्ये दिसून आल्या. चोरांनी चेहरा झाकलेला होता. दरम्यान, बँकेच्या सीसीटीव्हीत दोन चोरांच्या हालचाली कैद झाल्या असून याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – Mumbai Crime : गोवंडीत घरमालकाची भाडेकरुने केली हत्या, आरोपीस अटक 

बँकेकडून पोलिसात तक्रार दाखल

नाशिकमधील ICICI या बँकेमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेनंतर आता तेथील बँकेकडून याबाबतचे अधिकृत विधान समोर आले आहे. या चोरीच्या घटनेच्या सखोल चौकशीसाठी बँकेकडून तक्रार दाखल करण्यात आली असून या बँकेच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांना पुर्णतः सहकार्य करण्यात येत आहे. तर, ज्या खातेधारकांचे दागिने चोरीला गेले आहेत, त्यांचे नुकसान होणार नाही, याची खात्री असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.


Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -