घरक्राइमSalman Khan house Firing Case : बिष्णोई आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांर्गत कारवाई

Salman Khan house Firing Case : बिष्णोई आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांर्गत कारवाई

Subscribe

सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत चार आरोपी अटकेत असून त्यांच्यावर आता मोक्का कायद्यांतर्गत कारवाई कारण्यात आली आहे. तर याच गुन्ह्यांत गॅगस्टर लॉरेन्स विष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांना वॉन्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. (Salman Khan house Firing Case Bishnoi accused Action against under Mokka Act)

14 एप्रिलला सलमान खान याच्या घराजवळ बाईकवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. पाच ते सहा गोळ्या झाडल्यानंतर दोन्ही आरोपी बाईकवरुन पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही शूटरसह शस्त्रे पुरविणार्‍या चौघांना सुरत आणि पंजाब येथून पोलिसांनी अटक केली होती. विकीकुमार गुप्ता, सागरकुमार पाल, सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई आणि अनुजकुमार अशी या चौघांची नावे आहेत. याच गुंन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्यांत अनमोल आणि लॉरेन्स बिष्णोई याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेकडे भक्कम पुरावे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Accident News : अमेरिकेत 3 भारतीय महिलांचा रस्ते अपघातात मृत्यू; कार हवेत उडून झाडात अडकली 

बिष्णोई बंधू संघटित टोळ्या चालवत असून या टोळीची पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या गोळीबारात आता गुन्हे शाखेने मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. लवकरच साबरमती जेलमध्ये असलेल्या लॉरेन्सची गुन्हे शाखेकडून कस्टडी घेऊन चौकशी होणार आहे. अनमोल हा विदेशात वास्तव्यास असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

- Advertisement -

अटक वॉंरटची भीती दाखवून वृद्धेची फसवणूक

मुंबई : अटक वॉरंटची भीती दाखवून एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार माहीम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.

तक्रारदार महिला 71 वर्षांची असून ती माहीम परिसरात एकटीच राहते. गेल्या आठवड्यात तिला अज्ञात व्यक्तीने फोन करत तिच्या आधारकार्डवरून 25 बँक खाते उघडण्यात आले असून याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच लवकरच तिच्याविरुद्ध अटक वॉरंट निघणार असून अटक होऊ शकते. या गुन्ह्यांत तिला सात वर्षांचा कारावासासह वीस लाखांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, अशी भीती देखील त्याने घातली.

हेही वाचा – Cyber Crime : मुंबईतील महिलेला 25 कोटींचा गंडा, ऑनलाइन फसवणुकीने खळबळ

ही कारवाई थांबवायची असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगितले. अटकेच्या भीतीने तक्रारदार महिलेने अज्ञात व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात 1 लाख 94 हजार रुपये ट्रान्स्फर केले. हा प्रकार नंतर तिने तिच्या जावयाला सांगितला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबरल सेल हेल्पलाईनसह माहीम पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर माहीम पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -