घरक्राइमघातपाती कारावायांसाठी मुंबई-पुण्यात प्रशिक्षण, एनआयएचा न्यायालयात दावा

घातपाती कारावायांसाठी मुंबई-पुण्यात प्रशिक्षण, एनआयएचा न्यायालयात दावा

Subscribe

मुंबई : घातपाती कारवाया करण्याच्या दृष्टीने पुणे आणि मुंबईत तयारी सुरू होती. या प्रकरणी पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि गोंदिया येथून सुमारे 10 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) विशेष न्यायालयाला दिली. या प्रकरणात पडघा येथून अटक करण्यात आलेल्या शमिल नाचनला एनआयएने शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

स्फोटक रसायनांच्या सहाय्याने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी या प्रकरणी अटकेत असलेला अन्य आरोपी आकिब हा नाचनसह पुण्याला गेला होता. तेथून स्फोटक रसायन घेऊन ते दोघे परत आले. या सामग्रीबद्दल आरोपी काहीही माहिती देत नसल्याने आम्हाला त्याचा शोध घ्यायचा असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले.

- Advertisement -

नाचनच्या घरी सापडली संशयास्पद सामग्री
नाचन हा दोन सिमकार्ड वापरत होते. परंतु दोन्ही सिमकार्ड हे त्याच्या मित्राच्या नावावर आहेत. एवढेच नव्हे तर, 7 ते 8 ईमेल आयडीचा वापर नाचन करत होता आणि ते देखील दुसऱ्याच्या नावाचे होते. आरोपी नाचनच्या घरावर छापा टाकण्यात आला होता आणि तिथून अनेक संशयास्पद साहित्य सापडल्याचे एनआयएने सांगितले.

हेही वाचा – आमचा साबण ‘ECO’ फ्रेंडली…, भाजपातील इनकमिंगवर नितीन गडकरी यांची सूचक प्रतिक्रिया

- Advertisement -

नाचन आणि अन्य आरोपी आकिब या दोघांना एकमेकांसमोर बसवून त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. कारण दोघेही पुण्याला बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी एकत्र गेले होते, त्यामुळे त्या प्रशिक्षणात आणखी कोण होते? प्रशिक्षण कोणी दिले? या दोघांनी आणलेली स्फोटक कधी आणि कुठे वापरण्यात आली? ही सर्व माहिती मिळविण्यासाठी पुढील कोठडी वाढविण्यात यावी, अशी माहिती मागणी एनआयएने न्यायालयाला केली. शमिल हा मुंबईतील 2002-2003च्या बॉम्बस्फोटांतील आरोपी साकिब नाचन याचा मुलगा आहे.

नाचनच्या कोठडीत वाढ
सहा दिवसांची कोठडी मिळवून देखील एनआयए ठोस पुरावे किंवा नवी माहिती मिळवू शकलेले नाही. केवळ आता कारणे दिली जात आहेत. त्यामुळे आता नाचनला एआयएची कोठडी देऊ नये. तथापि, हे प्रकरण दहशतवादाशी संबंधित असल्याने तसेच तिचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने नाचनची कोठडी 23 ऑगस्ट 2023पर्यंत वाढविली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -