घरदेश-विदेशआमचा साबण 'ECO' फ्रेंडली..., भाजपातील इनकमिंगवर नितीन गडकरी यांची सूचक प्रतिक्रिया

आमचा साबण ‘ECO’ फ्रेंडली…, भाजपातील इनकमिंगवर नितीन गडकरी यांची सूचक प्रतिक्रिया

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेल्या अनेकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना सत्तेत महत्त्वाची पदे देण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच, या नेत्यांच्या चौकशी मागचे शुक्लकाष्ठ देखील तात्पुरते का होईना थांबते. याचसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचक विधान केले आहे. आमचा साबण ‘इको’ फ्रेंडली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

हेही वाचा – ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी पाळली लोकं, राज ठाकरेंचा खोचक टोला

- Advertisement -

एका खासगी वृत्तवाहनीच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे सूचक वक्तव्य केले. भाजपाने बनवलेल्या साबणाने पक्षात येणारा कलंकित नेता साफ होतो, यासंदर्भात गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला हसून उत्तर देताना गडकरी म्हणाले की, आमचा ‘इको’ फ्रेंडली साबण आहे. राजकारणात लोक येतात आणि जातात. अशा गोष्टी घडत राहतात. 1947 नंतर असे घडत आले आहे. राजकारण हा कम्पोझिशन, लिमिटेशन आणि कॉन्ट्रॅडिक्शनचा खेळ आहे. निवडणुकीत जिंकण्याचे राजकारण सर्वात महत्वाचे आहे आणि जो जिंकतो तो सिकंदर ठरतो. आघडीत मित्रपक्ष जोडावे लागतात. लोक आल्यावर आघाडीची ताकद वाढते. आम्हाला सुद्धा आमच्या आघाडीची ताकद वाढवायची आहे, असे त्यांनी सांगितले.

…आज त्यांनी आघाडी केली

नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या I.N.D.I.A.वर देखील निशाणा साधला. भाजपा आणि एनडीए हे मजबूत आहेत, हे विरोधकांना माहीत आहे. ते त्याचा सामना करू शकत नसल्याने त्यांनी ही एकजूट दाखवली. पण ज्या लोकांमध्ये कधीच ताळमेळ नव्हता, एकमेकांचे तोंडही बघायचे नव्हते… आज त्यांनी आघाडी केली आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, आमच्या विकासकामांचे मूल्यमापन जनता करेल. देशात पुन्हा एनडीएचे सरकार पूर्ण बहुमताने स्थापन होईल.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray : भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातला रिजेक्ट माल…, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

विरोधी पक्षांच्या या आघाडीचे रचनाकार आम्ही (भाजपा) आहोत. आमची शक्ती वाढल्याने त्यांना एकत्र यावे लागले. आम्हीही सांगतो की, या सर्वांनी एकत्र आणि आमच्याशी लढा. जे एकमेकांचा तोंड बघत नव्हते, एकमेकांसोबत बसून चहा घेतला नाही, ते आज आमच्यामुळे एकत्र आले आहेत. हताश होऊन काहीही करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

संघाचा हस्तक्षेप नाही

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबबात केलेला दावाही नितीन गडकरी यांनी फेटाळून लावला. सरकारी संस्था मंत्री नव्हे तर, आरएसएसचे लोक चालवत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, हा हास्यास्पद आरोप आहे. हे 100 टक्के असत्य आहे. मी आरएसएसचा स्वयंसेवक आहे, पण माझ्या कामात संघ कधीच हस्तक्षेप करत नाही. मला काम स्वतंत्रपपणे काम करू दिले जाते. विरोधी पक्षाला विरोधाची भूमिका घ्यावी लागते, हे मान्य आहे. पण त्यांनी अशा गोष्टी बोलल्या ज्याला काही आधार आहे, असेही गडकरींनी सुनावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -