Eco friendly bappa Competition
घर क्राइम महिलेची लिव्ह-इन पार्टनरकडून चाकून भोसकून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महिलेची लिव्ह-इन पार्टनरकडून चाकून भोसकून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

बंगळुरू : दिल्लीतील श्रद्धा वायकर हत्याकांडने देशभरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर देशात लिव्ह-इनमध्ये गुन्ह्यांच्या घटनेत वाढ होणात दिसत आहेत. यात बेंगळुरूमध्ये 34 वर्षीय महिलेला तिच्या लिव्ह-इन पार्टनरने चाकून भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा लिव्ह-इन पार्टनर हत्याकाड घडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या महिलेचे नाव रेणुका असे आहे. तर तिचा पार्टनरचे नाव जावेद असे असून हे दोन्ही केरळचे रहिवासी होते.

हे दोघे जण अडीच वर्षापासून लिव्ह-इन रिलेशीपमध्ये राहत होते. या जोडप्यात नेहमी वेगवेगळ्या मुद्यांवरून वाद होत होते. या दोघांमधील भांडणे हे मंडळवारी विकोपास केल्यानंतर रागाच्या भरात महिलेला आरोपीने चाकून भोसकून हत्या केली. या घटनेनंतर शेजारच्या वाटले की, दोघांमध्ये काही गडबड आहे. जेव्हा शेजारी आरोपी जावेदच्या फ्लॅटवर गेल्यानंतर त्यांनी रेणुकाला रक्ताच्या थारोळ्यात पडली असून आरोप हा तिच्या शेजरी बसला होता. यावेळी शेजारच्यांनी रेणुकाला रुग्णालयात नेहण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर जावेदने त्यांचा गुन्ह्याची कबूली दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime : लिव्ह इन पार्टनरला महिलेच्या भावानी केले खल्लास, टिटवाळ्यात उडाली खळबळ

श्रद्धा वायकर हत्याकांड

दिल्लीसह महाराष्ट्राला हादरवणारी भयंकर घटना सोमवारी उघडकीस आलीय. महाराष्ट्रातील श्रद्धा वायकर हिची हत्या करून तिचे 35 तुकडे करण्यात आलेत. त्यामुळेच याची सगळीकडेच चर्चा आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वायकर आणि बॉयफ्रेंड आफताब यांची एका डेटिंग अॅपवरून मैत्री झाली. दोघेही 2018 पासून एकत्र होते आणि एकमेकांसोबत खूप आनंदी असायचे. कालांतराने त्यांच्या नातेसंबंधात कटुता आली. रोजच्या मारामारी आणि भांडणांना कंटाळून श्रद्धाने हे नाते संपवायचे ठरवले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -