घरताज्या घडामोडीCoronavirus: CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Coronavirus: CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Subscribe

सर्व परीक्षा १ एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या 19 ते 31 मार्चदरम्यान होणार्‍या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) मंडळाने घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चनंतर घेण्यात येणार असल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

करोना विषाणूची लागण होणार्‍या व्यक्तींमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ वर पोहचली असताना देशातही संख्या वाढत आहेत. त्यामुळे सध्या मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाकडून घेण्यात आला आहे. 19 मार्चनंतर होणार्‍य सर्व परीक्षा रद्द करत त्या १ एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचे सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

आतापर्यंत देशात करोनाचे १४७ रुग्ण आढळले आहेत. तर त्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण बरे झाले आहेत. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात ४५ रुग्ण आढळले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -