घरदेश-विदेशअफगाण हवाई हल्ल्यात २०० तालिबानी ठार

अफगाण हवाई हल्ल्यात २०० तालिबानी ठार

Subscribe

अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकार्‍याच्या माहितीनुसार, तालिबानचे मोठे नुकसान

अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकार्‍याच्या माहितीनुसार, तालिबानला रविवारी मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. अफगाण हवाई दलाने शेबर्गन शहरात त्यांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान सदस्यांचा खात्मा झाला. अफगाणिस्तान सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमान यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले, आज सायंकाळी वायु सेनेकडून त्यांच्या सभा व लपून बसण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर, शेबर्गन शहरात २०० पेक्षा अधिक तालिबान दहशतवादी मारले गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -