घरदेश-विदेशचीनचा खोडसाळपणा, बुलेट ट्रेनमधून आणले सैन्य

चीनचा खोडसाळपणा, बुलेट ट्रेनमधून आणले सैन्य

Subscribe

अरुणाचल प्रदेशावर चीनचा दावा, मात्र भारताने लावला फेटाळून

जगावर कोरोनाचे संकट असताना चीनच्या सीमेवरील कुरापती काही केल्या कमी होत नाहीत. चीनने आता बुलेट ट्रेनमधून सैनिक अरुणाचल सीमेजवळ पाठवले आहे. भारताविरोधात शक्तिप्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे.

तिबेटची राजधानी ल्हासामधून बुलेट ट्रेनने सैनिक अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील निंगची शहरात पोहोचले आहे. चीन आणि भारतात ३४८८ किलोमीटर लाइन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोलवरून वाद आहे. त्यामुळे चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. चीन अरुणाचल प्रदेशावर आपला दावा सांगत आहे. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -