घरक्राइमAccident News : अमेरिकेत 3 भारतीय महिलांचा रस्ते अपघातात मृत्यू; कार हवेत...

Accident News : अमेरिकेत 3 भारतीय महिलांचा रस्ते अपघातात मृत्यू; कार हवेत उडून झाडात अडकली

Subscribe

अमेरिकेत एका भीषण कार अपघातात गुजरातमधील तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेत एका भीषण कार अपघातात गुजरातमधील तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेखाबेन पटेल, संगीताबेन पटेल आणि मनीषाबेन पटेल असे या महिलांचे नाव असून त्या गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील राहत होत्या. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील ग्रीनविले काउंटीमध्ये एका पुलावर जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलावरून खाली कोसळली. यावेळी तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. (3 Indian women died in a road accident in America The car flew into the air and got stuck in a tree)

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही महिला एसयूव्ही कारमधून प्रवास करत होत्या. त्याची कार दक्षिण कॅरोलिनाच्या ग्रीनविले काउंटीमध्ये एका पुलावरून भरगाव वेगाने जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. I-85 वर उत्तरेकडे जाणारी एसयूव्ही बॅरिकेडला धडकण्यापूर्वी आणि पुलाच्या विरुद्ध बाजूच्या झाडांना आदळण्यापूर्वी किमान 20 फूट हवेत फेकली गेली.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime : तडीपार गुन्हेगारासहा तिघांना अटक; एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे, चार काडतुसे जप्त

चीफ डेप्युटी कोरोनर माईक एलिस यांनी डब्ल्यूएसपीए या न्यूज चॅनेलला सांगितले की, अपघातग्रस्त कार निर्धारीत वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने प्रवास करत होती. या अपघातात अन्य कोणत्याही कारचा सहभाग नसल्याचे स्पष्ट आहे. अपघातानंतर कार झाडावर अडकलेली आढळून आली असून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चीफ डेप्युटी कोरोनर माईक एलिस म्हणाले, एखादे वाहन अपघातानंतर झाडावर अडकणे फार दुर्मिळ आहे. अपघातग्रस्त कार रहदारीच्या 4-6 लेन ओलांडून सुमारे 20 फूट झाडांवर आदळली.

- Advertisement -

जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर

अपघाताची माहिती मिळताच साउथ कॅरोलिना हायवे पेट्रोल, गँट फायर अँड रेस्क्यू आणि अनेक ग्रीनविले काउंटी ईएमएस युनिट्ससह आपत्कालीन प्रतिसाद संघांनी अपघाताच्या ठिकाणी प्रतिसाद दिला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नाने गाडी खाली आणली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.

 हेही वाचा – Cyber Crime : मुंबईतील महिलेला 25 कोटींचा गंडा, ऑनलाइन फसवणुकीने खळबळ

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -