घरदेश-विदेशधक्कादायक! आईने आपल्या ३ महिन्यांच्या बाळाला ५० हजाराला विकले आणि...

धक्कादायक! आईने आपल्या ३ महिन्यांच्या बाळाला ५० हजाराला विकले आणि…

Subscribe

घरची आर्थिक परिस्थिती आणि दारिद्र्यामुळे एखादा माणूस असहाय होतो. मात्र गोरखपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आईने ५० हजारांच्या हव्यासापोटी आपल्या पोटच्या ३ महिन्यांच्या चिमुकल्या मुलाचा सौदा केला. या हृदयद्रावक घटनेनंतर या महिलेने अपहरणाची खोटी कहाणीही बनविली. पोलिसांनी तत्परता दाखवत या चिमुकल्याचा तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १ तासाच्या आत मुलाला ताब्यात घेतले, त्याचबरोबर मुलाला विकत घेणारी महिला व मुलाची आई दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे.

गोरखनाथ पोलिस स्टेशन परिसरातील इलाईबाग परिसरातील रहिवासी सल्मा खातून हिने पोलिसांना सांगितले की, शहनाई मॅरिज हाऊसजवळ पायी जात होती. लाल साडी नेसलेली एक महिला चारचाकी गाडीत आली आणि मुलाला घेऊन गेली.संपूर्ण पोलिस पथकाला कारवाई करण्यास वेळ लागला नाही आणि एसपी सिटी सोनम कुमार घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला, एका तासाच्या आत ही घटना उघडकीस आली. यानंतर या दोन्ही बायकांना पोलिस ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला आधीच ३ मुले आहेत. त्यामुळे तिने आपले चौथे मूल विकून टाकण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मुलाचा जन्म देता येईल, असा तिचा विचार होता. हे तिने सर्व पोलिसांना तेव्हा पोलिसही आश्चर्यचकित झाले.


Video: हिमाचलमध्ये पावसाचे रौद्र रुप; ढगफुटीमुळे घरांचे नुकसान, वाहने पाण्याखाली
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -