घरदेश-विदेश१ नोव्हेंबरपासून होणार आहेत हे ५ मोठे बदल, सामान्यांच्या जीवनावर होणार थेट...

१ नोव्हेंबरपासून होणार आहेत हे ५ मोठे बदल, सामान्यांच्या जीवनावर होणार थेट परिणाम!

Subscribe

दिवाळीपूर्वीच (Diwali 2021) महागाईने उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून अनेक बदल होणार आहेत. या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक चिंता आणखी वाढू शकतात. हे बदल बँकिंग शुल्कापासून (Banking Charges)  एलपीजी सिलेंडरच्या किंमतीपर्यंत करण्यात आले आहेत. काय आहेत हे 5महत्वपूर्ण बदल जाणून घेऊयात.(5 Changes from 1st Novembe)

1- बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना द्यावे लागतील अधीक शुल्क

बँक ऑफ बडोदाच्या  ग्राहकांसाठी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आता  १ नोव्हेंबरपासून खातेधारकांकडून विशेष शुल्क आकारले जाणार आहे. पुढील महिन्यापासून, खातेधारकांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. हे शुल्क एका मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी लागू करण्यात येईल.दरम्यान, ग्राहक 3 वेळा विनामूल्य पैसे जमा करू शकतील, तसेच त्यानंतर त्यांना 40 रुपये शुल्क द्यावे लागतील. महत्वाची बाब म्हणजे जनधन खातेधारकांना हा नियम लागू होणार नाही. याशिवाय पैसे काढल्यावर देखील 100 रुपये रक्कम आकारले जाणार आहे.

- Advertisement -

2- गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल

भारतीय रेल्वेने १ नोव्हेंबरपासून देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी देखील  हा बदल करण्याचा निर्णय रेल्वेेने घेतला होता. रेल्वेने १ ऑक्टोबरपासून देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचे ठरले होते, मात्र हा नियम पुढे ढकलण्यात आला. येत्या १ नोव्हेंबरपासून सुमारे 13 हजार पॅसेंजर गाड्या आणि 7 हजार मालगाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. एवढेच नाही तर देशातील सुमारे ३० राजधानी गाड्यांच्या वेळाही बदलणार आहेत.

3- गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी OTP आवश्यक असेल

पुढील महिन्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडर बुक करण्याची नियमांमध्ये देखील बदल होणार आहे. नवीन नियमानुसार, गॅस बुकिंगसाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. गॅस सिलेंडर घरी पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला हा OTP सांगावा लागेल. यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

- Advertisement -

4- दिल्लीतील शाळा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार

राजधानी दिल्लीत कोरोना महामारीनंतर सरकारने  सोमवार, १ नोव्हेंबरपासून सर्व वर्गांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.तसेच जी मुले शाळेत येऊ शकत नाहीत म्हणजेच वर्गात शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसतील त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू राहतील.

5- गॅस सिलेंडरची किंमत वाढण्याची शक्यता

एलपीजी सिलेंडरच्या किमतीचा तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत यावेळीही गॅस सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हे ही वाचा – National Unity Day 2021: सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने का साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिवस?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -