घरताज्या घडामोडी'वानखेडे जन्मापासून मुस्लिमच, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांनी दिलेली क्लीनचीट संशयास्पद'

‘वानखेडे जन्मापासून मुस्लिमच, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांनी दिलेली क्लीनचीट संशयास्पद’

Subscribe

धर्मांतरावरून होत असलेल्या आरोपांमुळे काल, शनिवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जातीसंबंधी कागदपत्र दिल्याची माहिती अरुण हलदर यांनी दिली आणि म्हटले की, ‘वानखेडेंचे जातीसंबंधीची कागदपत्र तपासून त्यांनी धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते नाही. असे वैयक्तिक आरोप करणे योग्य नाही आहे.’ या अनुषंगाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिमच आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्षांनी दिलेली क्लीनचीट संशयास्पद आहे.’

नक्की काय म्हणाले मलिक? 

‘समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहेत. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. वानखेडेंचे संपूर्ण कुटुंब मुस्लिम समाजाप्रमाणे वागत होते. वानखेडेंनी नोकरीसाठी नाव बदलण्याचे काम केले. वानखेडेंच्या घरात नाव बदलण्याचा खेळ सुरू आहे. बहीण यास्मिनचं जास्मिन आणि दाऊतच ज्ञानदेव झालं. जेव्हापासून फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांना एअरपोर्टवर अडवून चौकशी करण्यास सुरुवात झाली तेव्हापासून समीर वानखेडेंचे नाव समोर येऊ लागले,’ असे मलिक म्हणाले.

- Advertisement -

पुढे नवाब मलिक म्हणाले की, ‘२०१५ पासून वानखेडे ओळख लपवत आहेत. वानखेडे यांनी खोटेपणाने बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली आहे. एका मागासवर्गीयाचा हक्क वानखेडेंनी हिरावून घेतला आहे. समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची योग्य पडताळणी व्हायला व्हावी. यांसदर्भात मी सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार आहे. हलदर यांनी संवैधानिक पदाचा मान ठेवून वागावं. थेट माध्यमांसोबत बोलणं म्हणजे डाळ मैं कुछ काळा है.’


हेही वाचा – नवाब मलिक यांच्या विरोधी भाजप नेते मोहित कंबोज यांची पोलीस ठाण्यात तक्रार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -