घरदेश-विदेशParliament Security Breach : आरोपींचा गट, रेकी, गोंधळ आणि प्लॅनिंग; ‘या’ साठी...

Parliament Security Breach : आरोपींचा गट, रेकी, गोंधळ आणि प्लॅनिंग; ‘या’ साठी केली संसदेत घुसखोरी

Subscribe

Parliament Security Breach : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काल (ता.13 डिसेंबर) धक्कादायक घटना घडली. दोन तरूणांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहाता उड्या मारल्या. त्याचप्रमाणे तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत गोंधळ घातला. त्यानंतर या तरूणांना ताब्यात घेण्यात आले. संसदेच्या आवारातही एका तरुणाने स्मोक कँडल पेटवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या तरूणांमध्ये एक तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे.

काल (ता.13डिसेंबर) लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृता उड्या मारल्या त्यानंतर एक मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेची सुरक्षा भंग करण्याचा कट 6 जणांनी रचला होता. सहाही अरोपी गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी प्लॅन केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व अरोपी एकमेकांच्या संपर्कात होते, आणि बुधवारी (ता.13डिसेंबर) संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली. कट रचणाऱ्या सहा पैकी 5 आरोपींना पोलिसांनी पकडलं आहे.

- Advertisement -
हेही वाचा… Parliament : संसदेत गोंधळाचे महाराष्ट्र कनेक्शन; अमोल शिंदेच्या गावाकडे पोलीस रवाना

बुधवारी (ता.13डिसेंबर) लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या सभागृहात मारल्या. त्यामधील एका व्यक्तीने त्याच्या बुटातून पिवळ्या रंगाचा स्प्रे काढला आणि सभागृहात फवारणी केली. त्याच प्रमाणे त्यांनी घोषणा देखील दिला. यावेळी संसदेत गदारोळ झाला. खासदारांनी इकडे-तिकडे पळापळ सुरू केली. तर काही खासदारांनी त्यांना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणामध्ये एका महिलेला आणि एका पुरूषाला अटक करण्यात आली आहे.

नीलम आणि अमोल अशी त्या दोन अरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सहा अरोपींपैकी 5 आरोपिंना पकडलं आहे. तर एका अरोपीचा तपास शोध सुरू आहे. पोलिसांनी नीलम, अमोल, सागर, विशाल आणि मनोरंजन यांना ताब्यात घेतलं आहे. तर दुसरा आरोपी ललित याचा शोध सुरू आहे. यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

चौकशीदरम्यान अमोलने सांगितले की, मी शेतरी आंदोलन, बेरोजगारी, मणिपूर हिंसाचार यांसारख्या मुद्द्यांमुळे त्रस्त आहे आणि त्यामुळेच त्याने हे केले. या सर्व आरोपींची विचारधारा एकच आहे. त्यांना सरकारला संदेश द्यायचा होता म्हणून त्यांने हा सर्व प्रकार घडवून आणला. अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र हा सर्व प्रकार घडवून आणण्यासाठी आरोपींना कोणत्या व्यक्तीने सांगितले आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

हेही वाचा… Parliament Security Breach : “संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर…”, NCPकडून सरकारवर टीका

यासर्व प्रकरणामध्ये पोलिसांनी विशालच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. याघटने संदर्भात तिची संभाव्या भूमिका तपासण्यात येत आहे. संसदेतमध्ये सहाही आरोपींना प्रवेश करायचा होता,मात्र दोघांनाच पास मिळाला. अमोल आणि नीलम संसदेबाहेर रंगाचा धूर सोडत असल्याचा व्हिडीओ बनवला होता. लिलतने या दोघांना व्हिडीओ बनवायला सांगितलं होते. ललितने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही पोस्ट केले आहेत. त्याचप्रमाणे ललितकडे अमोल, नीलम, सागर आणि मनोरंजन यांचे फोन होते.

पोलीस कर्मचारी नीलमला ताब्यात घेत असताना ती म्हणाली, भारत सरकार आमच्यावर अत्याचार करत आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवतो तेव्हा आम्हाला मारहाण करून तुरुंगात टाकले जाते. आपल्यावर बळाचा वापर केला जातो. आम्ही कोणत्याही संघटनेशी संबंधित नाही. आम्ही विद्यार्थी आहोत आणि बेरोजगार आहोत. आमचे पालक मजूर म्हणून काम करतात, शेतकरी आहेत आणि काही छोटे दुकानदार आहेत. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. हुकूमशाही चालणार नाही.

हेही वाचा… Parliament : संसदेत गोंधळाचे महाराष्ट्र कनेक्शन; अमोल शिंदेच्या गावाकडे पोलीस रवाना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसरा, दोन्ही आरोपी भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांच्या व्हिजिटर पासचा वापर करून सभागृहात पोहोचले होते. प्रताप सिम्हा मनोरंजनला ओळखत होते. संसदेच्या नवीन इमारतीला भेट देण्याच्या बहाण्याने त्याला पास दिला. तर अमोल हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे, तो पदवीधर आहे पण बेरोजगार आहे. तो प्लंबर म्हणून काम करायचा. त्याने पोलिसांना सांगितले की त्याने कल्याण येथून सुमारे 1,200 रुपयांना 5 रंग उडवणारे स्प्रे खरेदी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -