घरताज्या घडामोडीराजस्थानच्या झुंझुनूमध्ये भीषण अपघात, पिकअप पलटल्यामुळे ८ जणांचा मृत्यू तर १० जण...

राजस्थानच्या झुंझुनूमध्ये भीषण अपघात, पिकअप पलटल्यामुळे ८ जणांचा मृत्यू तर १० जण जखमी

Subscribe

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात झाला आहे. जिल्ह्यातील गुढागौडजी पोलीस स्टेशनच्या परिसरात भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात झाला आहे. या पिकअपमध्ये प्रवास करत असलेल्या ९ भाविकांचा मृत्यू झाला असून १० लोकं गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, जागीच ८ जणांचा मृत्यू झाला तर रुग्णालयात उपचारासाठी दाखळ करताना एकाचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानमध्ये दुपारी पावने तीनच्या सुमारास राज्य महामार्ग क्रमांक ३७ वर गुढागौडजीजवळ अपघात झाला. पिकअपमधून भाविक लोहार्गलहून परतत होते. या दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातामध्ये सहभागी असलेले सगळं मृत व्यक्ती अहीरोंची ढाणी तन खेतडीतील रहिवासी आहेत असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

राजस्थानच्या डॉक्टर परिवाराचा अपघातात मृत्यू

राजस्थानच्या एका डॉक्टर परिवारासाठी मंगळवार घातवार ठरला आहे. राज्याच्या सीकर जिल्ह्यातील रींगसमधील निवासी डॉ. सतीश पूनिया, पत्नी सरिता आणि मुलगा दक्ष, मुलगी राजवी इतर नातेवाईक यांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. क्रेटा कारची टक्कर होऊन दरीत कोसळल्यामुळे परिवाराचा जागीच मृ्त्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर परिवार हिमाचल आणि मनाली टूरसाठी गेले होते. परंतु पंजाबच्या रोपडमध्ये त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. परतत असताना बसने टक्कर दिली. यामुळे गाडी दरीत कोसळली आणि प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.


हेही वाचा ; Abu salem case : अबू सालेमच्या शिक्षेचा कालावधी संपण्याआधीच मुक्तता अशक्य – गृह मंत्रालय

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -