घरदेश-विदेश'झोलर' नीरव मोदीची सिंगापूर पासपोर्टवर परदेशवारी

‘झोलर’ नीरव मोदीची सिंगापूर पासपोर्टवर परदेशवारी

Subscribe

पंजाब नॅशलन बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळ काढलेला हिरे व्यापारी नीरव मोदी बिनधास्तपणे परदेश वारी करत आहे. यासाठी तो भारतीय नाही तर सिंगापूरचा पासपोर्ट वापरत असल्याची माहिती आता समोर आली आहे. नीरव मोदी आणि त्याचा भाऊ निशाल विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची विनंती सीबीआयने सोमवारी इंटरपोलला केली होती. शिवाय मुंबईतल्या विशेष न्यायालयाने देखील नीरव मोदीच्या कुटुंबाविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केला आहे.

पंजाब नॅशलन बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळ काढलेला हिरे व्यापारी नीरव मोदी बिनधास्तपणे परदेश वारी करत आहे. यासाठी तो सिंगापूरचा पासपोर्ट वापरत असल्याची माहिती आता समोर आली आहे. नीरव मोदीने घोटाळा करून पळ काढल्यानंतर भारत सरकारने नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला आहे. नीरव लंडनमध्ये राजकीय आश्रय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती भारताला मिळाली. भारतीय उच्चायुक्त यासंदर्भातील माहिती मिळवत असल्याचे कळताच नीरव मोदीने ब्रसेल्सला पळ काढला. मंगळवारी किंवा बुधवारी नीरव मोदी लंडनमधून ब्रुसेल्सला पळाला असून त्यासाठी त्याने सिंगापूरचा पासपोर्ट वापरल्याची माहिती आता समोर येत आहे.

नीरव विरोधात रेड कॉर्नर नोटीस

नीरव मोदी आणि त्याचा भाऊ निशाल विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची विनंती सीबीआयने सोमवारी इंटरपोलला केली होती. नीरव मोदीने ३१ मार्च पासून भारतीय पासपोर्ट वापरलाच नसल्याची माहिती इंटरपोललने भारताला दिली आहे. शिवाय मुंबईतल्या विशेष न्यायालयाने देखील नीरव मोदीच्या कुटुंबाविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केला आहे. नीरव मोदी सध्या सिंगापूरचा पासपोर्ट वापरत आहे. सिंगापूर सरकारने नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करावा यासाठी  भारताला सिंगापूर सरकारवर दबाव टाकावा लागेल तेव्हाच नीरवचा सिंगापूर पासपोर्ट रद्द होऊ शकतो. सुत्रांनी तशी माहिती दिली आहे.

- Advertisement -

रेड कॉर्नर नोटीस म्हणजे काय?

इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस संस्था आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फरार असलेल्या गुन्हेगारांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली जाते. रेड कॉर्नर नोटीस ही गुन्हेगारांचा पत्ता मिळवून ज्या देशात गुन्हेगाराने गुन्हा केला आहे त्या देशाच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस बजावली जाते. इंटरपोल अर्थात आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -