घरदेश-विदेशमोदी तुम्ही तरी हस्तक्षेप करा! केजरीवालांचे पंतप्रधानांना आर्जव

मोदी तुम्ही तरी हस्तक्षेप करा! केजरीवालांचे पंतप्रधानांना आर्जव

Subscribe

प्रशासकीय अधिकारी आणि दिल्लीतील आप सरकारमधील वाद अद्याप मिटलेला नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी नायब राज्यपालांच्या घरी ठिय्या मांडला असून या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. चार दिवसानंतर देखील नायब राज्यपाल आणि केजरीवाल यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि दिल्लीच्या आम आदमी सरकारमधील वाद मिटलेला नाही. या वादात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करत तोडगा काढण्याची विनंती अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांना पत्राद्वारे केली आहे

प्रशासकीय अधिकारी आणि दिल्लीतील आप सरकारमधील वाद अद्याप मिटलेला नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी नायब राज्यपालांच्या घरी ठिय्या मांडला असून या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. प्रशाकीय अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या असहकाराविरोधात अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या घरी उपोषण सुरू केले. पण चार दिवसानंतर देखील नायब राज्यपाल आणि केजरीवाल यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि दिल्लीच्या आम आदमी सरकारमधील वाद मिटलेला नाही. या वादात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करत तोडगा काढण्याची विनंती अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. केजरीवाल यांच्या विनंतीला मोदी काय प्रतिक्रिया देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्या मंत्र्यांनी मुख्य सचिवांना मारहाण केल्याच्या प्रकरणावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केजरीवाल सरकारशी असहकार पुकारला आहे. त्यामुळे आप सरकारची कोंडी झाली असून राज्यकारभार हाकण्यात सरकारला अडचणी येत आहे. मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेला हा वाद मिटवा असा पवित्रा घेत अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या धरी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अद्याप तरी नायब राज्यपाल आणि केजरीवाल यांची भेट न झाल्याने या प्रकरणात कोणताही तोडगा निघालेला नाही. तर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असहकार पुकारल्याचे अनिल बैजल यांनी पूर्णपणे नाकारले आहे. त्यामुळे, दिल्लीतील परिस्थिती जैसे थे आहे. परिणामी, या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याची विनंती अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांना केली आहे. मंगळवारपासून सत्येंद्र जैन आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी उपोषणाला सुरूवात केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या असहकारामुळे आप सरकारची महत्त्वाकांक्षी ‘घरपोच रेशन’ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येत आहेत. शिवाय पाण्यासह अनेक प्रश्न देखील प्रलंबित आहेत. या साऱ्या नाट्यमय घडामोडीनंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्जव केल्याने पंतप्रधान मोदी हे प्रकरण आता कशा प्रकारे हाताळतात हे पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

भाजपचे आंदोलन

नायब राज्यपालांच्या घरी टीम केजरीवालने आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर भाजप नेते मनजिंदर सिरसा यांनी देखील अरविंद केजरीवाल यांच्या घरी आंदोलनाला सुरूवात केली. यावेळी भाजप नेत्यांसह आपमधून निलंबित झालेले आप नेते कपिल मिश्रा देखील हजर होते. केजरीवाल यांनी नौटकी बंद करत कामावर परतावे अशी मागणी सिरसा यांनी केली. त्यामुळे राजधानी दिल्लीत प्रशासकीय अधिकारी विरूद्ध आप सरकार विरूद्ध भाजप असा तिरंगी सामना रंगल्याचे पाहायाला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -