घरदेश-विदेश'खामोश! भाजप सोडून कुठेही जाणार नाही'

‘खामोश! भाजप सोडून कुठेही जाणार नाही’

Subscribe

शॉर्टगन शत्रुघ्न सिंन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधत आहे. भाजप माझा पक्ष तर लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या घरातील सदस्य हे माझ्यासाठी कुटुंबासारखे असल्याचे उत्तर शत्रुघ्न सिंन्हा यांनी दिले आहे. भाजपला रामराम ठोकत शत्रुघ्न सिंन्हा हातात कंदील घेणार असल्याची अर्थात राष्ट्रीय जनता दलात (राजद) प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर त्यांनी भाजप पक्ष तर लालु प्रसाद यादव आणि त्यांच्या घरातील सदस्य कुटुंबासारखे असल्याचे म्हटले आहे. 

शॉर्टगन शत्रुघ्न सिंन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधले आहे. भाजप माझा पक्ष तर लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या घरातील सदस्य हे माझ्यासाठी कुटुंबांसारखे असल्याचे प्रत्युत्तर शत्रुघ्न सिंन्हा यांनी दिले आहे. भाजपला रामराम ठोकत शत्रुघ्न सिंन्हा हातात कंदील घेणार असल्याची अर्थात राष्ट्रीय जनता दलात (राजद) प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर त्यांनी भाजप पक्ष तर लालु प्रसाद यादव आणि त्यांच्या घरातील सदस्य कुटुंबांसारखे असल्याचे म्हटले आहे.

शॉर्ट गन धडाडली

शत्रुघ्न सिंन्हा राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यानंतर लालू प्रसाद यादव, राबरी देवी, लालू प्रसाद यांची मुले तेजस्वी, तेज आणि मीसा यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कौंटुबिक मैत्री असल्याचे शत्रुघ्न सिंन्हा यांनी सांगितले. कौंटुबिक मैत्रिमुळे घरी येणे- जाणे हे होते. त्यात गैर काय? असा सवाल देखील शत्रुघ्न सिंन्हा यांनी केला. मागील काही महिंन्यांपासून शत्रुघ्न सिंन्हा लालू प्रसाद यादव यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये दिसले. शिवाय, त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर देखील टीका केली. तसेच लालू प्रसाद यादव आपले खुप चांगले मित्र असल्याचा उल्लेख देखील वारंवार केला. त्यामुळे भाजपला रामराम ठोकत शत्रुघ्न सिंन्हा ‘राजद’मध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधाण आले. पण, साऱ्या चर्चांना पूर्णविराम देत भाजप सोडून कुठेही जाणार नसल्याचे शत्रुघ्न सिंन्हा यांनी स्पष्ट केले. भाजप माझा पक्ष आणि लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या घरातील सदस्य माझ्यासाठी कुटुंबांप्रमाणे असल्याचे देखील पुन्हा एकदा स्पष्ट केले. भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसह शत्रुघ्न सिंन्हा यांना पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर देखील टीका केलेली आहे.

- Advertisement -

‘शत्रुघ्न सिंन्हा यांच्यावर अन्याय’

भाजपमध्ये शत्रुघ्न सिंन्हा यांच्यावर अन्याय झाल्याची भावना लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी याने बोलून दाखवली. ‘शत्रुघ्न सिंन्हा यांना ‘बिहारी बाबु’ म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी बिहारसाठी खूप काही केले आहे. या जमेच्या गोष्टी असताना देखील भाजपने त्यांना नेहमी वाईटच वागणूक दिल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. शत्रुघ्न सिंन्हा यांच्या राजद प्रवेशावर विचारले असता तेजस्वी यांनी शत्रुघ्न सिंन्हा हे मोठे नेते आहेत. कोणत्या पक्षात जायचे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. त्यांनी केलेल्या कामांचा विचार करता त्यांना कुणीही पक्षात सहजपण प्रवेश देईल’ असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -