घरदेश-विदेशJNU : ABVP आणि डाव्या गटातील विद्यार्थ्यांमध्ये JNU मध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

JNU : ABVP आणि डाव्या गटातील विद्यार्थ्यांमध्ये JNU मध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली : निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून जेएनयूमधील भाषा विभागात दोन विद्यार्थी गटांमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या भांडणाचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जेएनयूमधील भाषा विभागात निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून गुरुवारी रात्री दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले.

हेही वाचा – Photo: देशभरातील बिबट्यांची आकडेवारी जाहीर; महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय

- Advertisement -

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे कायमच वादात असते. गुरुवारी रात्री पुन्हा एकदा इथे वाद झाले. विद्यापीठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या वादात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ती काही विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांवर सायकल फेकताना दिसत आहे. विद्यापीठ सुरक्षा कर्मचारी या विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या गटातील विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. या घटनेवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आमच्याकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तक्रारींची चौकशी करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – NCP SP : जब्बारांनी रिल्स लाइफच्या माध्यमातून डिग्निटी जपली, परंतु…; महायुतीला खुले पत्र

जेएनयूमध्ये विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यात १० फेब्रुवारीलाही जेएनयू कॅम्पमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ABVP आणि डाव्या गटात संघर्ष झाला होता. यामध्ये दोन्ही गटांचे विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला होता. २०२४ च्या JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची निवड करण्यासाठी साबरमती धाब्यावर युनिव्हर्सिटी जनरल बॉडी मीटिंग बोलावण्यात आली होती, यावेळी हा वाद झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -