घरक्राइमCrime News : आणखी एक रक्तरंजित 'लिव्ह इन रिलेशनशिप'; महिलेने पार्टनरवर केले...

Crime News : आणखी एक रक्तरंजित ‘लिव्ह इन रिलेशनशिप’; महिलेने पार्टनरवर केले चाकूचे वार

Subscribe

कोलकाता : श्रद्धा वालकर, सरस्वती वैद्य हत्याकांडानंतर आणखी एक रक्तरंजित ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची घटना समोर आली आहे. पण या प्रकरणात महिलेने पार्टनरवर चाकूचे वार करत हत्या केली आणि नंतर स्वत:च फोन करून पोलिसांना त्याची माहिती दिली. ही घटना बुधवारी घडली. संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली असून हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – Supreme Court : आमदार, खासदारांना वैयक्तिक आयुष्य नाही का, कशावरून भडकले सरन्यायाधीश?

- Advertisement -

संगती पॉल असे आरोपीचे नाव असून पार्टनरचे नाव सार्थक दास आहे. तो व्यवसायाने फोटोग्राफर होता. तर, 32 वर्षीय संगती पॉल मेकअप आर्टिस्ट आहे. संगती पॉलचा फोन आल्यानंतर पोलिसांनी डमडम परिसरातील तिच्या घरी धाव घेतली. तेथील दृश्य पाहून चक्रावूनच गेले. रक्ताच्या थारोळ्यात सार्थक दासचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काही कारणावरून मतभेद होते. बुधवारी सकाळी संगतीने सार्थकवर धारदार चाकूने वार केले. सार्थकच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. पोलिसांनी सांगितले की, संगती पॉलने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे. मात्र, हत्येचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या महिलेला हत्येच्या विविध कलमान्वये अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi : मोदी, ठाकरेंनंतर आता राहुल गांधीही काळारामाच्या दर्शनाला

सार्थकच्या सोशल मीडियाच्या टाइमलाइनवर संगतीसोबतचे अनेक फोटो आहेत. तीन दिवसांपूर्वीच त्याने आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता. 20 आणि 22 फेब्रुवारी रोजी सार्थकने त्याचा डीपी बदलला, ज्यामध्ये त्याने संगतीला लाइफलाइन म्हटले आहे. त्यासोबत एक लव्ह इमोजी जोडला आहे. मात्र, संगतीच्या टाइमलाइनवर सार्थकचे एकही छायाचित्र दिसत नाही.

हेही वाचा – Bangalore Blast : कॅफेतील स्फोटाने बंगळुरू हादरले; चौघे जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -