घरदेश-विदेशChandrayaan-3 नंतर आता इस्रोची 'आदित्य एल-1' मोहीम, सूर्याचा करणार अभ्यास

Chandrayaan-3 नंतर आता इस्रोची ‘आदित्य एल-1’ मोहीम, सूर्याचा करणार अभ्यास

Subscribe

भारताने चांद्रयान-3 ही मोहीम फत्ते केल्यानंतर आता आणखी मोहीमेसाठी इस्रो सज्ज होत आहे आणि ती मोहीम असणार आहे 'आदित्य एल-1'. ही एक सौर मोहीम असून याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : 23 ऑगस्ट 2023 हा दिवसाच्या भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे. काल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या भुपृष्ठावर चांद्रयान-3 यशस्वीरित्या लँड झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार भारत हा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे या मोहीमेत सहभागी असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे विशेष असे कौतुक करण्यात येत आहे. भारताने चांद्रयान-3 ही मोहीम फत्ते केल्यानंतर आता आणखी मोहीमेसाठी इस्रो सज्ज होत आहे आणि ती मोहीम असणार आहे ‘आदित्य एल-1’. ही एक सौर मोहीम असून याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संस्थेने ही मोहीम हाती घेतली असून ही सर्वात किचकट आणि आव्हानात्मक मोहीम असल्याचे बोलले जात आहे. (After Chandrayaan-3, now ISRO’s ‘Aditya L-1’ mission will study the Sun)

हेही वाचा – ISRO : ‘चांद्रयान-3’ ने इतिहास रचताना लाइव्ह स्ट्रीमिंगचा मोडला रेकॉर्ड; एवढ्या लोकांनी पाहिले यशस्वी लँडिंग

- Advertisement -

आदित्य एल-1 इस्रोच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मोहीम असणार आहे. ही मोहीम ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात येई शकते. हे मिशन सर्वच कारणांनी अत्यंत वेगळे असणार आहे. कारण अंतराळातून 24 तास सूर्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठीचे जे यान अंतराळात पाठवण्यात येणार आहे, ते पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या एल-1 या कक्षेमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आदित्य एल-1 हे ज्या ठिकाणी उतरविण्यात येणार आहे त्याला अंतराळातील पार्किंगची जागा देखील म्हणतात. त्यामुळे या जागेवरूनच सूर्याच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून त्याचा अभ्यास करता येणार आहे.

अंतराळातील एल-1 या कक्षेमध्ये आधीपासूनच अनेक उपग्रह तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आदित्य एल-1 हे देखील याच कक्षेमध्ये ठेवून त्याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. या अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदा सूर्यमालेत स्पेस ऑब्जर्वेटरी तैनात करण्यात येणार असून आदित्य एल-1 च्या माध्यमातून सूर्यावर 24 तास लक्ष ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

आदित्य एल-1 च्या हे अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कणांचा प्रसार आणि प्रदेश इत्यादी सर्व समस्या जाणून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती प्रदान करेल. असा विश्वास इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. पेलोडचा सूट कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअरची हालचाल आणि त्यांची वैशिष्ट्ये देखील या मोहीमेच्या माध्यमातून समजून घेण्यास सोपी होईल, असेही सांगण्यात आले आहे.

बुधवारी (ता. 23 ऑगस्ट) चांद्रयान-3 चे लँडिंग (चंद्रावरील वेळेनुसार) पहाटे 5.30 वाजता सुरू झाले. रफ लँडिंग खूप यशस्वी झाली. यानंतर लँडरने पहाटे 5.44 वाजता उभी लँडिंग केली. तेव्हा चंद्रापासून चांद्रयान-3 चे अंतर 3 किमी होते. चांद्रयान-3 ने आपल्या 20 मिनिटांत चंद्राच्या शेवटच्या कक्षेतून 25 किमीचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. लँडरने संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -