Eco friendly bappa Competition
घर क्राइम Manish Jain : आम्हाला न्यायाची अपेक्षा; दोन दिवसांच्या ED चौकशीनंतर मनीष जैन...

Manish Jain : आम्हाला न्यायाची अपेक्षा; दोन दिवसांच्या ED चौकशीनंतर मनीष जैन यांची प्रतिक्रिया

Subscribe

Manish Jain : जळगावमधील (Jalgaon) सुप्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत असलेल्या कर्जासाठी आठवड्याभरापूर्वी ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात आली होती. यानंतर राजमल लखीचंद ज्वेलर्सचे संचालक मनीष जैन (Manish Jain) आणि त्यांची पत्नी नीतिका जैन (Nithika Jain) यांची दोन दिवस चाललेली ईडी चौकशी बुधवारी (24 ऑगस्ट) संपली यानंतर माध्यमांशी बोलताना मनीष जैन यांनी प्रतिक्रिया दिली की, ईडी चौकशी दरम्यान (ED investigation) मी सर्व सहाकार्य केलं असून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. मात्र यावेळी त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या मुख्य आरोपाबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. (Manish Jain We expect justice Manish Jains reaction after two days of ED interrogation)

राजमल लखीचंद ज्वेलर्सचे संचालक मनीष जैन आणि त्यांची पत्नी नितिका जैन यांची नागपुरमधील ईडी कार्यालयात सलग दोन दिवस सुरू असलेली ईडी चौकशी बुधवारी संपली. यानंतर बोलताना मनीष जैन म्हणाले की, जळगावमध्ये अनेक तास चौकशी झाल्यानंतर आमची पुन्हा नागपुरात देखील अनेक तास चौकशी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे जे काही नवीन डॉक्युमेंट्स मागितले होते, ते सर्व आम्ही त्यांना दिले आहेत. आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य केले असून आम्हाला आता न्यायाची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मनीष जौन यांनी दिली.

राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या प्रमुखांची पुढील काही दिवसांत होणार चौकशी

- Advertisement -

मनीष जैन म्हणाले की, ईडी चौकशीच्या दोन्ही दिवशी जैन धर्माचा पर्युषण पर्व सुरू होता. त्यामुळे ईडीची चौकशी सुरु असतानाही आमच्या सर्व धार्मिक प्रार्थना सुरू होत्या. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे प्रमुख ईश्वरलाल जैन यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी पुढील काही दिवसात चौकशी करावी, अशी मागणी केली होती आणि ईडीने ती मान्य केली आहे, अशी माहिती मनीष जैन यांनी दिली.

मुख्य आरोपावर बोलण्यास नकार

दरम्यान, एसबीआयकडून कर्ज घेताना गॅरंटी म्हणून दाखवलेलं 1300 किलो सोने दाखवण्यात आले होत, मात्र छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना फक्त 40 किलो मिळाले. राजमल ज्वेलर्सने शेकडो कोटींचे कर्ज घेताना त्याची गॅरंटी म्हणून दाखवण्यात आलेल सोनं प्रत्यक्षात मिळालेच नाही. ते फक्त कागदोपत्रीच होती. या मुख्य आरोपाबद्दल मनीष जैन यांनी विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

काय आहे प्रकरण?

- Advertisement -

जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर मागील आठवड्यात 17 ऑगस्ट रोजी स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत असलेल्या कर्जासाठी एकाच वेळी सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणच्या सहा कंपन्यांवर ईडीने आणि आयकर विभागाने छापेमारी केली होती.

- Advertisment -