घरक्रीडाइंडिजनंतर आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी प्रशिक्षक द्रविडला दिली जाणार विश्रांती

इंडिजनंतर आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी प्रशिक्षक द्रविडला दिली जाणार विश्रांती

Subscribe

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या टीमला विश्रांती दिली जाणार असून, तेव्हा व्ही.व्ही.एस. लक्ष्मण भारतीय संघाला प्रशिक्षण देणार आहे.

नवी दिल्ली ः भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. मात्र, यावेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या टीमला विश्रांती दिली जाणार असून, तेव्हा व्ही.व्ही.एस. लक्ष्मण भारतीय संघाला प्रशिक्षण देणार आहे.

जसा-जसा विश्वकप जवळ येऊ लागला आहे, तसे-तसे भारतीय क्रिकेट संघात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. याची चुणूक वेस्ट इंडिजविरुद्ध जाहीर झालेल्या संघातून मिळाली आहे. तर निवड समितीच्या प्रमुखपदी नव्यानेच विराजमान झालेले अजित आगरकर यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली असून, संघाला एकसंघ ठेवण्यासोबतच अनुभवासोबत युवा जोश असायला हवा म्हणुन सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी त्यांना नेतृत्वगुण पणाला लावावे लागणार आहे.
अशातच आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले राहुल द्रविड यांना वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विश्रांती देण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त असून, विंडीज दौऱ्यानंतर आर्यलंडविरुद्ध खेळविल्या जाणाऱया टी-20 मालिकेत हे बदल दिसणार आहेत.

- Advertisement -

तर मग लक्ष्मण करणार टीम इंडियाला मार्गदर्शन
2022 या वर्षात राहुल द्रविड याला कोरोना झाल्यानंतर टीम इंडियासोबत व्हीव्हीएस लक्ष्मण होता. आता आयर्लंडविरुद्ध मालिकेत राहुल द्रविडला विश्रांती दिली जाणार असल्याने यावेळी भारतीय संघाला लक्ष्मण प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा ः तीन महिन्यानंतर होणारा भारत-पाक सामना पहायचाय, तर एका रात्रीसाठी मोजावे लागतील 50 हजार

- Advertisement -

अशी असणार नवी प्रशिक्षण टीम
आयर्लंड दौऱ्यावर लक्ष्मणसह सितांशू कोटक आणि हृषिकेश कानेटकर ( फलंदाजी प्रशिक्षक), ट्रॉय कुली व साईराज बहुतुले ( गोलंदाजी प्रशिक्षक) हे जाण्याचा अंदाज आहे. याआधी लक्ष्मणने आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाचे मार्गदर्शन केले होते. शिवाय द्रविडला कोरोना झाल्यामुळे आशिया चषक 2023 मध्येही लक्ष्मण संघासोबत होता.

हेही वाचा ः बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास, वनडेत भारतीय संघाला पहिल्यांदा नमवले

पुन्हा परतणार राहुल द्रविड आणि त्याची टीम
वर्ल्ड कपपूर्वी द्रविड आणि त्यांच्या सहाय्यक सदस्यांना हा मिनी ब्रेक दिला जाणार आहे. 31 ऑगस्टपासून आशिया चषक होणार आहे आणि त्यासाठी राहुल द्रविड अँड टीम व भारताचे सीनियर्स खेळाडू पुन्हा परततील आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका व वर्ल्ड कप स्पर्धा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -