घरलाईफस्टाईलसावधान, WhatsApp व्हिडीओमधूनही हॅक होऊ शकतो तुमचा मोबाईल

सावधान, WhatsApp व्हिडीओमधूनही हॅक होऊ शकतो तुमचा मोबाईल

Subscribe
सध्या स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. अशातच सोशल मीडियात किंवा व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेज आपण सातत्याने पाहत असतो. मात्र अलीकडल्या काळात याच्याच माध्यमातून नागरिकांची फसवणूक केल्याची प्रकरणे वाढू लागली आहेत.
व्हॉट्सअॅपचा वापर सर्वाधिक केला जातो. त्यामुळे सायबर हल्लेखोर आणि हॅकर्स याच्याच माध्यमातून नागरिकांची फसवणूक करतात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीला युजर्स सुद्धा काही प्रमाणात जबाबदार असतात. कारण तेव्हा व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्सकडे लक्ष दिले जात नाही. काही वेळेस व्हॉट्सअॅप फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ही फोन हॅक होऊ शकतो.
तुम्हाला माहिती नसेल फेसबुकने व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक महत्त्वाची सुचना दिली आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅपवर आलेला कोणताही व्हिडिओ डाउनलोड करण्यापूर्वी त्याबद्दल अधिक माहिती घ्या. त्यानंतरच व्हिडिओ डाउनलोड करा. अन्यथा तुम्ही हॅकिंगचे शिकार होऊ शकता. फेसबुकच्या या  सुचनेनंतर भारतातील कंप्युटर इमर्जेंसी रेस्पॉन्स टीमने सुद्धा सर्व भारतीयांना आपले व्हॉट्सअॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर आलेल्या कोणत्याही अज्ञात व्हिडिओवर लगेच क्लिक करुन तो डाउनलोड करू नका.
अज्ञात व्हिडिओमध्ये तुम्हाला एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून MP4 फाइल मिळेल. जेव्हा तुम्ही ती फाइल उघडून पहाल, तेव्हा हॅकिंगची प्रक्रिया सुरु होईल. हा व्हिडिओ पाहताना तो सामान्य वाटेल पण तो प्ले झाल्यानंतर हॅकर्सला तुमच्या फोनचा एक्सेस मिळेल. त्यामुळे प्रत्येक आयफोन आणि अॅन्ड्रॉइड युजरने आपले व्हॉट्सअॅप अपडेट करावे.
असा करा बचाव 
असे अज्ञात फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड होऊ नये म्हणून तुम्ही व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये जा. येथे तुम्हाला Storage and Data चा ऑप्शन मिळेल. यावर टॅप करा. येथे तुम्हाला ऑटोमॅटिक मीडिया डाउनलोडचा ऑप्शन मिळेल. या सेटिंग्सला तुम्ही ऑफ करा. यामुळे तुम्हाला आलेले फोटो किंवा व्हिडिओ आपोआप डाउनलोड होणार नाही.
——————————————————————————————————हेही वाचा- पावसात Laptop भिजला, मग पटकन करा ‘या’ 3 गोष्टी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -