घरदेश-विदेशरशिया-युक्रेन युद्धाच्या झळा मद्याला, भारतातील बीअर महागणार

रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा मद्याला, भारतातील बीअर महागणार

Subscribe

बार्लीचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादन रशियामध्ये आहे, तर युक्रेन जागतिक स्तरावर बार्लीचे चौथ्या क्रमांकाचे उत्पादन करणारा देश आहे. जर संकट आणखी वाढले तर जागतिक स्तरावर बार्लीच्या किमती वाढू शकतात.

नवी दिल्लीः रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम मद्यावर होणार असून, शीतपेयातील प्रमुख घटक असलेल्या बीअरचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच बीअरच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारतातील बीअरच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बीअर प्रेमींसाठी हा मोठा धक्का आहे. आधीच रशिया-युक्रेन संघर्षामुळे व्होडकासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे, कारण अमेरिका आणि कॅनडातील अनेक राज्ये रशियन-निर्मित आणि रशियन-ब्रँडेड उत्पादनांवर बहिष्कार घालत आहेत. बीअर उत्पादनात महत्त्वाचा घटक असणाऱ्या बार्लीचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये युक्रेन आणि रशियाचाही समावेश आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा बार्लीवर परिणाम

बार्लीचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादन रशियामध्ये आहे, तर युक्रेन जागतिक स्तरावर बार्लीचे चौथ्या क्रमांकाचे उत्पादन करणारा देश आहे. जर संकट आणखी वाढले तर जागतिक स्तरावर बार्लीच्या किमती वाढू शकतात.

- Advertisement -

भारतात बार्लीचे उत्पादन होते

भारतातही बार्लीचे उत्पादन केले जाते आणि देशातील अनेक ब्रुअरीज फक्त बार्लीच्या देशांतर्गत उत्पादनावर अवलंबून आहेत. बार्लीच्या जागतिक किमतींमुळे देशांतर्गत दर प्रभावित होऊ शकतात.

बीअर महाग होऊ शकते

जागतिक बार्लीच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास आणि देशांतर्गत दर आंतरराष्ट्रीय किमतींनुसार बदलल्यास खरेदी खर्च वाढेल. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आवडत्या बीअरसाठी जास्त पैसे द्यावे लागतील.

- Advertisement -

बीअर कंपन्या आणि सरकार

बिरा 91 या बिअर ब्रँडचे मुख्य कार्यकारी अंकुर जैन यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, रशिया-युक्रेनच्या सध्याच्या संकटाचा जागतिक बार्लीच्या किमतींवर परिणाम होणार आहे, ज्या आधीच वाढल्यात. मात्र, हे अल्प ते मध्यम मुदतीचे असेल, असे जैन यांनी सांगितले. कंपन्या ताबडतोब किमती वाढवतात की नाही हे यावर अवलंबून असेल आणि अल्कोहोलच्या किमती निश्चित करण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या राज्य सरकारांवर देखील अवलंबून असणार आहे.


हेही वाचाः भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -