घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: अमेरिका युक्रेनमध्ये का नाही पाठवत सैन्य? पुतीन यांना घाबरतायत का...

Russia-Ukraine War: अमेरिका युक्रेनमध्ये का नाही पाठवत सैन्य? पुतीन यांना घाबरतायत का बायडेन?

Subscribe

रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) आज पाचवा दिवस आहे. युक्रेन शक्तिशाली रशियासोबत एकटाच लढत आहे. पण कोणत्याही पाश्चिमात्य देशाने युक्रेनला सैन्याची मदत केली नाहीये. युद्धाच्या पूर्वी अमेरिका सतत रशियाला हल्ला न करण्याचा धमकी देत राहिला, परंतु जेव्हा युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली तेव्हा राष्ट्रपती जो बायडेन यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन सैन्य युक्रेनमध्ये रशियन सैन्यासोबत लढणार नाही. दरम्यान अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांनी रशियावर युद्धा व्यतिरिक्त सर्व प्रकारचे निर्बंध लावले आहेत. पण आता अमेरिका युक्रेनला सैन्याची मदत का करत नाहीये? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संयुक्त राष्ट्रमध्ये अमेरिकन राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड (Linda Thomas-Greenfield) म्हणाले की, ‘बायडेन प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ते आपल्या सैन्याला धोक्यात टाकू शकत नाही.’ मग असे कोणते कारण ज्यामुळे अमेरिका युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्यास संकोच करत आहे.

- Advertisement -

महायुद्धाची भीती

युक्रेनमध्ये अमेरिकन सैन्य न पाठवण्यामागचे अनेक कारणे सांगितली जात आहेत. पाश्चिमात्य देश याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत. सर्वात पहिल्यांदा अमेरिकाचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी स्वतः सैन्य युक्रेनमध्ये न पाठवण्याचे कारण सांगितले आहे. त्यांनी एबीसी वृत्तसंस्थेसोबत बातचित करताना सांगितले की, ‘जर रशिया आणि अमेरिकन सैन्य एकमेकांसोबत भिडले तर महायुद्ध होऊ शकते. जसे अमेरिकन सैन्य युक्रेनमध्ये घुसेल तसे युद्धाचे रुपांतर महायुद्धात होईल.’

सध्या प्रादेशिक युद्ध 

अमेरिकत रिटायर्ड लेफ्टिनंट जनरल मार्क हर्टलिंग (Mark Hertling) यांनी सीएनएनसोबत बोलताना सांगितले की, ‘युद्धाची शक्यता मर्यादित करण्यासाठी मुत्सद्देगिरी ही सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. सध्या युक्रेनवर होत असलेला हल्ला दुःखद बाब आहे. हे प्रादेशिक युद्ध आहे. जर अमेरिका किंवा नाटो सैन्य रशियासोबत लढण्यासाठी युक्रेनची मदत करते तर हे एका जागतिक युद्धात रुपांतरित होऊ शकते. कारण रशिया आणि अमेरिका दोघांकडे परमाणुची ताकद आहे. या कारणामुळे अमेरिका आणि नाटो देश इतर मदत पोहोचवून रशियाविरोधात युक्रेनला यश प्राप्त करू देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.’

- Advertisement -

हेही वाचा – Russia-Ukraine crisis : जर्मनीसह युरोपियन देशांचे रशियावर हवाई निर्बंध, मॉस्कोकडूनही अनेक देशांचे हवाई मार्ग बंद


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -