घरक्रीडाPBKSs Captain 2022 : मयंक अग्रवालकडे पंजाब किंग्जची धुरा, फ्रेंचायझीने १२ कोटींमध्ये...

PBKSs Captain 2022 : मयंक अग्रवालकडे पंजाब किंग्जची धुरा, फ्रेंचायझीने १२ कोटींमध्ये केले होते रिटेन

Subscribe

मयंग्र अग्रवालच्या आधी लोकेश राहुल पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वामध्ये पंजाबने दोन हंगामात चांगले प्रदर्शन केले होते. दरम्यान राहुलने मेगा ऑक्शनपूर्वीच स्वतःला संघापासून अलग केले.

आयपीएल टीम पंजाब किंग्जने आपल्या संघाचा कर्णधार म्हणून मयंक अग्रवालला नियुक्त केले आहे. मयंकच्या नेतृत्वामध्ये पंजाबचा संघ आयपीएल २०२२ मध्ये खेळणार आहे. यापूर्वी लोकेश राहुलकडे संघाची कमान होती तसेच अग्रवालनेसुद्धा एका सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते तेव्हा संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र या संघात मयंक अग्रवालला कर्णधार करणार असल्याची शक्यता होती. मेगा ऑक्शपूर्वी संघाने दोन खेळाडूंना रिटेन केले होते. मयंक अग्रवाल यामधील पहिला खेळाडू होता तर त्याच्याव्यतिरिक्त अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला रिटेन केले होते. यानंतर आता मयंक अग्रवालला संघाचा कर्णधार करण्यात आले आहे.

पंजाब किंग्जच्या संघाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन कर्णधाराची घोषणा केली आहे. मयंक अग्रवालला कर्णधार केल्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला आहे. यंदा पंजाबला खिताब जिंकून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अद्याप पंजाबच्या टीमने आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Punjab Kings (@punjabkingsipl)

- Advertisement -

पंजाब टीम ग्रुप ‘बी’मध्ये

आयपीएल २०२२च्या हंगामात आयपीएल संघाला ग्रुप बी मध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये चेन्नई, हैदराबाद, दिल्ली आणि बंगळूरू, गुजरातचा समावेश आहे. या संघांना दोन-दोन सामने खेळावे लागणार आहेत. तर मुंबई, कोलकाता, राजस्थान, लखनऊ विरुद्ध एक सामना खेळावा लागणार आहे.

- Advertisement -

मयंक अग्रवालपूर्वी राहुल होता कर्णधार

मयंग्र अग्रवालच्या आधी लोकेश राहुल पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वामध्ये पंजाबने दोन हंगामात चांगले प्रदर्शन केले होते. दरम्यान राहुलने मेगा ऑक्शनपूर्वीच स्वतःला संघापासून अलग केले. यानंतर लखनऊच्या संघाने १७ करोडमध्ये राहुलला आपल्या संघात घेतले आहे. राहुलनंतर मयंक अग्रवाल कर्णधारपदाच्या रेसमध्ये प्रबळ दावेदार मानला जात होता. राहुलच्या नेतृत्वात संघाचे प्रदर्शन खान नव्हते. मागील हंगामात संघाने अनेक सामने गमावले होते. टीम गुणतालिकेत आठव्या स्थानी होती. पंजाबने चौदा सामन्यांमधून ६ सामने जिंकले होते तर ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

आयपीएल २०२२ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये सगळ्यात कमी खेळाडूंना रिटेन केले होते. पंजाबने फक्त दोन खेळाडूंना रिटेन केले होते. तसेच मेगा ऑक्शमध्ये पंजाब फ्रेंचायझी सगळ्यात जास्त रुपये घेऊन उतरली होती. आता संघात शिखर धवन, कगिसो रबाडा, लियम लिविगस्टोन आणि जॉनी बेयरस्टोसारखे खेळाडू आहेत.


हेही वाचा : श्रेयस अय्यरने फिफ्टी, फिफ्टी आणि फिफ्टी ठोकल्या, एकट्याने 200 हून अधिक धावा केल्या

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -