घरदेश-विदेश'जागेचे नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत, मी तिथे येण्यास तयार'

‘जागेचे नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत, मी तिथे येण्यास तयार’

Subscribe

‘जागेचे नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत. मी तिथे येण्यास तयार आहे’ असे आव्हान असदुद्दीन ओवेसी यांनी अनुराग ठाकूर यांना दिले आहे. नागपाडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांच्या गोळ्या घाला वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना थेट आव्हान दिलं आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणतात की, मी अनुराग ठाकूर यांना आव्हान देतो की, त्यांनी मला भारतातील त्या जागेचं नाव सांगाव जिथे मला गोळ्या घालणार आहेत. मी तिथे येण्यास तयार आहे. तुमच्या वक्तव्याने माझ्या मनात कोणतीही भीती निर्माण होणार नाही. कारण आमच्या मनात माता आणि भगिनी देश वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले अनुराग ठाकूर

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. ज्यावर दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी रिपोर्ट मागविला आहे. रिठाला येथील भाजपचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी निवडणुकीच्या सभेत आलेल्या लोकांना ‘गद्दारो को गोली मारो’ अशा प्रतिघोषणा दिल्या. या घोषणेनंतर सोशल मीडियावर गद्दार हा हॅशटॅगचा ट्रेंड सुरू झाला आहे. तसंच सभेतीला हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणाबाजी करताना लोक देखील साथ देताना दिसत आहेत. लोकांकडून वादग्रस्त घोषणाबाजी केल्यामुळे अनुराग ठाकूर यांच्या टीकेची झोड उठली आहे. ज्येष्ठ वकील आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते प्रशांत भूषण यांनी असं म्हटलं की, ‘अशा व्यक्तीने मंत्रीमंडळात नसावे तर तरुंगात असावे’, असा टोला त्यांनी लगावला आहे. तर काँग्रेसकडून अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -