घरताज्या घडामोडीराजस्थानचे गुंड आणि कोल्हापूर पोलिसांमध्ये गोळीबार

राजस्थानचे गुंड आणि कोल्हापूर पोलिसांमध्ये गोळीबार

Subscribe

कोल्हापुरमधील किणी टोल नाक्यावर राजस्थानातील कुख्यात गुंड आणि कोल्हापूर पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत गुडांकडून गोळीबार होताच प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही गुंड जखमी झाल्याचं समोर येत आहे. कोल्हापूर पोलिसांनी राजस्थानच्या या गुंडांना अटक केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून यामुळे कोल्हापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

राज्यस्थान पोलिस कर्नाटकच्या हद्दीतून गुंडांचा पाटलाग करत होते. मात्र पोलिसांना चकवा देऊन गुंड पलायन झाले होते. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामुळे किणी टोलनाक्यावर कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचला होता. यादरम्यान स्विफ्ट डिझायरमधून आलेल्या या गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी देखील प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केला. मात्र या गोळीबारात काही गुंड जखमी झाल्याचं समोर आलं आहे. रामलाल गोवर्धन बिश्नोई (वय २२, रा. जोधपूर), श्रवणकुमार मनोहरलाल मांजू बिश्नोई (वय २४, रा. जोधपूर), या दोघांना सीपीआरमध्ये दाखल केलं आहे. तर कारचालक श्रीराम पांचाराम बिश्नोई (वय २३, रा. बेटलाईन जोधपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

शामलाल बिश्नोई या गुंडाने किणी टोलनाक्यावर अवघ्या सात फुटांवर असलेल्या पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. अचानक गोळीबार झाल्याने पोलीस थेट रस्त्यावर झोपले. त्यावेळी पाठीमागे असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सावंत यांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. त्यामुळे अनेक पोलिसांचा जीव वाचला.


हेही वाचा – नाशिक भीषण अपघात; मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -