घरदेश-विदेशभारताला विमान अपहरण करण्याची धमकी

भारताला विमान अपहरण करण्याची धमकी

Subscribe

भारतीय विमानाचे अपहरण करण्यात येणार असल्याची धमकी एअर इंडियाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये आलेल्या फोनने दिली आहे. त्यामुळे सर्व विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये एका अनोळखी व्यक्तीने फोन करुन विमान अपहरण करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं आहे की, एक फ्लाइट हायजॅक करुन पाकिस्तानात नेण्यात येईल. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अतिरेकी पुन्हा दोन मोठे हल्ले करणार असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. शुक्रवारी पनवेल येथील एका बसमध्येदेखील बॉम्ब सापडला होता. त्याशिवाय, मुंबईतील रेल्वे स्थानकांवर देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर आता विमान अपहरणाची धमकी आली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे फोनमध्ये?

एअर इंडियाच्या ऑपरेशनसेंटरमध्ये अचानक आलेल्या फोनने एकच खळबळ उडाली आहे. या फोनमधून एका व्यक्तीने धक्कादायक माहिती दिली आहे. ही फक्त माहिती नाही तर धमकी आहे. या फोनमध्ये तो अनोळखी व्यक्ती सांगतो की, ‘एका भारतीय एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करुन ते पाकिस्तानात नेण्यात येणार आहे.’

- Advertisement -

विमानतळावर कडेकोट बंदोबस्त

विमान अपहरणाच्या धमकी नंतर विमानतळावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या धमकीनंतर ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS)ने विमानतळांवर खबरदारीचे निर्देश दिले आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर अगोदरपासूनच विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. आता या धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडेकोट करण्यात आली आहे. विमानतळा प्रवेश करणाऱ्या प्रवासी, कर्मचारी, सामना, कॅटरिंग आदींचे कडेकोट तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -