घरमुंबईमेळघाटातील आरोग्य संस्थांना उभारी

मेळघाटातील आरोग्य संस्थांना उभारी

Subscribe

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण यंत्रणेसह मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शनिवार पासून दौऱ्यावर गेले आहेत. शनिवार सकाळपासून या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. यावेळी १० आरोग्य संस्थांना १०० नेब्युलायझरचे वाटप करण्यात आले आहे.

मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण यंत्रणेसह शनिवार पासून मेळघाट दौऱ्यावर गेले आहेत. शनिवारी सकाळी मेळघाटातील सेमाडोहपासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

पहिले डिजीटल गाव

शिवाय, या दोैऱ्यात राज्यस्तरीय जंतनाशक मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला. हरिसाल या पहिल्या डिजीटल गावातून आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतांची गोळी देण्यात आली. त्यासोबतच लहान मुलांच्या श्वसनासंबंधी संसर्गावर प्रभावी साधन ठरलेले १०० नेब्युलायझर यंत्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण आणि नागरिकांना ६०० क्विंटल धान्याचे वाटपही करण्यात आले.

- Advertisement -
Health Minister Eknath Shinde,Melghat
आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे,मेळघाट

वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार

याविषयी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, ” सर्व विभागांच्या साहाय्याने कुपोषणावर मात करत मेळघाटातील बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मोहिम राबवण्यात येणार आहे. शासनाकडून आरोग्यसेवक, स्वयंसेविका, ग्रामसेवक, शाळा यांच्या माध्यमातून गावोगाव कुपोषण निर्मूलनासाठी पोषक आहार, आरोग्य जागृती, सुसज्ज आरोग्य केंद्रे याबरोबरच टेलिमेडिसिन, मोटरबाईक ॲम्ब्युलन्स असे उपक्रम राबवले जात आहेत. कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य, महिला आणि बालविकास, ग्रामविकास आदी विभागांच्या समन्वयातून संयुक्तपणे मोहिम राबवण्यात येणार आहे. “

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -