घरदेश-विदेशअखिलेश यादवांचा मुंबई दौरा, शरद पवारांची भेट घेणे टाळले?

अखिलेश यादवांचा मुंबई दौरा, शरद पवारांची भेट घेणे टाळले?

Subscribe

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे काल मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी ते महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांना भेटणार असल्याचे बोलले जात होते. पण त्यांनी विरोधी पक्षातील एकाही नेत्याची भेट न घेता तेच परतले आहेत.

मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे काल (ता. 10 जुलै) मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी ते महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांना भेटणार असल्याचे बोलले जात होते. पण त्यांनी विरोधी पक्षातील एकाही नेत्याची भेट न घेता तेच परतले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे अखिलेश यादव हे कोणत्याही राजकीय हेतूने नाही तर खासगी कामानिमित्त मुंबईला आले होते, अशी माहिती समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून देण्यात आली आहे. पण राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांवरून स्वतः अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Akhilesh Yadav’s visit to Mumbai, meeting Sharad Pawar avoided)

हेही वाचा – Maharashtra Politics : ‘त्या’ 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

- Advertisement -

देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेच्या गादीवरून खाली उतरवण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे समेट घडवून आणण्याचे काम करत आहेत. असे असताना आता अखिलेश यादव यांनी मुंबईत येऊन सुद्धा पवारांची किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्याची भेट न घेतल्याने विरोधकांच्या आघाडीत सारे काही ठीक तर आहे ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

अखिलेश यादव यांनी मुंबई दौऱ्यात समाजवादी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच ते ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते तिथे त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. तर एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईत येऊनही मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याची तक्रार करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपवर टीकास्त्र डागत भाजप समाजात तोडफोड करत असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबई दौऱ्यावर असलेल्या अखिलेश यादव यांनी काही प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, टोमॅटोचे भाव कडाडल्याची बातमी दाखवली तरी सध्याच्या केंद्र सरकारमध्ये हलकल्लोळ माजतो. डाळतांदळापासून पेट्रोलपर्यंत प्रत्येक वस्तू महागल्या आहेत. पण दडपशाही इतकी आहे की, उत्तर प्रदेशात कोणी टोमॅटोचा भाव विचारला तरी त्याला पोलीस अटक करतात. देशातला शेतकरी एक ना अनेक समस्यांनी त्रस्त आहे. आणि त्यामुळंच अर्थव्यवस्था डगमगत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -