घरक्राइमभूमीअभिलेख विभाग की लाचखोरांचा अड्डा? उपअधीक्षक महिला 'एसीबी'च्या जाळ्यात

भूमीअभिलेख विभाग की लाचखोरांचा अड्डा? उपअधीक्षक महिला ‘एसीबी’च्या जाळ्यात

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्ह्यात आणि विभागात लाचखोरी थांबताना दिसत नाहीये. मागील सात महिन्याच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करूनही लाचखोरांवर त्याचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. लाचखोरांची पैसे खाण्याची मुजोरी ही कायमच असल्याचं सातत्याने दिसून येत आहे. त्यातही भूमिअभिलेख विभाग जणू काही लुटारूंचा अड्डाच आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचे कारण म्हणजे या विभागातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत असंख्य लाचखोर मागील काही काळात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. तरीही येथील अधिकारी आणि कर्मचारी निर्धास्तपणे लाचखोरी करतच आहेत आणि त्यांच्यावर सातत्याने कारवायाही होत आहेत. अशीच एक लाचखोरीची घटना सिन्नर तालुक्यात घडली आहे. यामध्ये एका महिला उपअधीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नरच्या भूमी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक महिलेला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाने कारवाई करत या महिलेला रंगेहात अटक केली आहे. प्रतिभा दत्तात्रय करंजे (४२) असे सिन्नर येथील भूमी अभिलेख
कार्यालयातील उपअधीक्षक लाचखोर महिलेचे नाव आहे. सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील ३७ वर्षीय तक्रारदाराने मनेगाव येथे सर्वे नंबर १९७, १९८, १९९ असे तीन प्लॉट पत्नीचे नावे खरेदी केले होते. या प्लॉटवरील जुने मालकाचे नाव कमी करून तक्रारदाराच्या पत्नीचे नवीन नाव लावण्यासाठी तक्रारदाराने सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक प्रतिभा करंजे यांच्याकडे गेल्या बुधवारी (दि. ५) अर्ज केला होता. सदर प्लॉटवर नवीन नावाची नोंदणी व जुने नाव कमी करण्यासाठी प्रतिभा करंजे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती.

- Advertisement -

उपअधीक्षक करंजे यांनी जमिनीवर नाव लावण्यासाठी लाच मागितल्या नंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी
केल्यानंतर पथकाने सोमवारी (दि. १०) सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार, उपअधीक्षक प्रतिभा करंजे यांनी तक्रारदारांकडून पंचासमक्ष कार्यालयातच ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारली. त्यावेळी सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, प्रकाश डोंगरे, संतोष गांगुर्डे, प्रणय इंगळे, शितल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -