घरदेश-विदेशअरेच्चा! महिला बॉसने कर्मचाऱ्यांना जाहीर केला ८२ लाखांचा ख्रिसमस बोनस

अरेच्चा! महिला बॉसने कर्मचाऱ्यांना जाहीर केला ८२ लाखांचा ख्रिसमस बोनस

Subscribe

प्रत्येक देशात त्या देशातील मोठ्या सणाला बोनस देण्याची परंपरा आहे. भारतात दिवाळी सणाला विविध कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. अर्थात या बोनसचे स्वरुप अनेक ठिकाणी वेगवेगळं असतं. परंतु, ऑस्ट्रेलियातील एका कंपनीतील महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी तब्बल ८२ लाख बोनस दिला आहे. लेडी बॉसने ख्रिसमस बोनस (Christmas Bonus) म्हणून ८२ लाख देण्याचे जाहीर केले आहे.

Hancock Prospecting या कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा Gina Rinehart यांनी आपल्या Roy Hill या कंपनीतील १० कर्मचाऱ्यांना ८२ लाख रुपये बोनस दिला आहे. ही कंपनी Gina Rinehart यांच्या वडिलांनी स्थापन केली होती. Gina Rinehart या ऑस्ट्रेलियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असून त्यांची ३४ बिलिअन डॉलर एवढी संपत्ती आहे.

- Advertisement -

हेही वाचा -यापुढे मी नेता नाही… नितीश कुमार यांनी दिले संकेत

एक महत्त्वपूर्ण घोषणा करायची असल्याचं सांगत राइनहार्ट यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावलं होतं. यावेळी त्यांनी बोनस जाहीर करणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. मात्र, एवढी मोठी घोषणा करण्यात येईल, असं कर्मचाऱ्यांना वाटलं नव्हतं. त्यामुळे ८२ लाखांचा बोनस जाहीर होताच कर्मचारी आश्चर्यचकीत झाले.

- Advertisement -

राइनहार्ट यांनी एक बैठक बोलावली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा १० कर्मचाऱ्यांची नावे त्यांनी जाहीर केली. जाहीर झालेल्या नावांना १००,००० डॉलर (जवळपास ८२ लाख) रुपये ख्रिसमस बोनस देणार असल्याचं सांगण्यात आलं. बोनस मिळणाऱ्यापैकी एक कर्मचारी तर नुकताच तीन महिन्यांपूर्वी रुजू झाला होता.

राईनहार्ट यांच्या कंपनीने गेल्या १२ महिन्यांत ३.३ अरब डॉलरचा नफा कमावला आहे. यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांप्रती बॉसने आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा – ‘या’ राज्यात झिका व्हायरसची दहशत; 5 वर्षांच्या चिमुकलीला लागण, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -