घरदेश-विदेशयापुढे मी नेता नाही...; नितीश कुमार यांनी दिले संकेत

यापुढे मी नेता नाही…; नितीश कुमार यांनी दिले संकेत

Subscribe

बिहार: मला पंतप्रधान व्हायचे नाही आणि मुख्यमंत्री पण व्हायचे नाही. मला केवळ भाजपला पराभूत करायचे आहे, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. बिहार सरकारमधील नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भविष्यातील राजकीय भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, माझे लक्ष्य हे केवळ भाजपला पराभूत करणे हेच असणार आहे. त्यामुळे यापुढे आपला नेता तेजस्वी यादव असेल. तोच आपले नेतृत्त्व करेल. २०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका आपल्याला तेजस्वी यादवच्या नेतृत्त्वात लढायच्या आहेत. तसेच २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा आहे. तेजस्वी यादव हा लालू प्नसाद यांचा मुलगा आहे.

- Advertisement -

यापुढे सरकारमधील काही काम असेल तर ते तेजस्वी यादवच करतील. ते अन्य कामेही करुनही घेतली. आपआपसात भांडू नका. कोणी आपल्यात भांडण लावून देत असेल तर त्यांचे ऐकू नका, असा सल्ला नितीश कुमार यांनी आमदारांना दिला.

महाराष्ट्रात जून महिन्यात अचानक सत्ता बदल झाला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. या गटाने भाजपशी हातमिळवणी करुन महाविकास आघाडी सरकार पाडले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात उप मुख्यमंत्री पदाची माळ पडली. हा सत्ता बदल करण्यात भाजपचाच हात होता.

- Advertisement -

महाराष्ट्रातील राजकीय नाट्य बिहारमध्येही होणार होते. भाजपची खेळी वेळीच नितीश कुमार यांच्या लक्षात आली. त्यांनी तडकाफडकी भाजपसोबत काडीमोड घेतली. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांच्या राजदला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. याचा फटका भाजपला बसला. त्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपविरोधी सर्व नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली. त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार हेच पंतप्रधान पदाचे दावेदार असतील, अशी चर्चा सुरु झाली होती. कारण २०१९ च्या निवडणुकीत नितीश कुमार हेदेखील पंतप्नधान पदाच्या शर्यतीत होते. मात्र नितीश कुमार यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भाजपची साथ सोडली, मुख्यमंत्री पद नाही सोडले

महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. राजदशी हातमिळवणी केली. हा सत्ता बदल अवघ्या दोन तासांत घडला. दुपारी २ वाजता नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला व अवघ्या दोन तासांत म्हणजे संध्याकाळी ४ वाजता त्यांनी पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा केला. सत्ता बदल करताना नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली पण मुख्यमंत्री पद काही सोडले नाही, अशी चर्चा रंगली होती.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -