घरCORONA UPDATECorona Virus : जगभरात कोरोनाचा उद्रेक; आठ दिवसांत २० लाख रूग्णवाढ

Corona Virus : जगभरात कोरोनाचा उद्रेक; आठ दिवसांत २० लाख रूग्णवाढ

Subscribe

गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाचा विखळा जगाभोवती बसला असून या कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगभरात कोरोना रूग्णांची संख्या अडीज कोटी झाली असून आतापर्यंत ६ लाख १७ हजार २५४ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून इशारा दिला आहे की, सर्वकाही ठिक होण्यापूर्वी परिस्थिती अजून खराब होणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार पूर्वी २० लाख रूग्ण होण्यासाठी १५ आठवडे लागत होते. तर आता आठ दिवसांत २० लाख इतकी रूग्णसंख्या झाली आहे. तर १५ आठवड्यात १ कोटी ३० लाख इतकी रूग्णसंख्या होत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा हा एक कोटी ५० लाख ०९ हजार २१३ इतका झाला आहे.

कोरोनाचे सर्वाधित रूग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ४२ हजार ०७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३९ लाखाहून अधिक रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल असून येथे २१ लाख इतकी रूग्णसंख्या आहे. तर ८१ हजार जणांचा येथे मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतातही कोरोना विषाणुचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता दररोज ३५ हजारांहून अधिक रूग्णांची वाढ देशात होत आहे. देशात आतापर्यंत १२ लाख कोरोनाबाधितांचा आकडा झाला आहे. तर रिकव्हरी रेट ६३ टक्के इतका झाला आहे. covid19india.org मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आता १२ लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी सकाळपर्यंत ११ लाख ९२ हजार ९१५ इतकी होती. एकीकडे २८ हजार ७३२ जणांच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ७ लाख ५३ हजार ०५० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

बॉलिवूड स्टार्सचे पाकिस्तानी सैन्य, ISI शी लागेबंधे; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -